ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

दलित समाजाच्या भावना दुखविल्या प्रकरणी आ. संजय गायकवाड यांच्या विरूद्ध कारवाई करा; रिपब्लिकन सेना जालना जिल्ह्याच्या वतीने तालुका पोलीसांना निवेदन

July 3, 202115:52 PM 11 0 0

जालना (प्रतिनिधी) ः बुलढाणा येथील शिवसेनेचे आ. संजय गायकवाड यांनी दोन समाजामध्ये तेड निर्माण करणारे वक्तव्य केले असून यामुळे दलित समाजाच्या भावना दुखविल्या गेल्या असल्याने आ. गायकवाड यांच्या विरूध्द तात्काळ गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन सेना जालना जिल्ह्याच्या वतीने पोलीस निरीक्षक तालुका पोलीस ठाणे जालना यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बुलढाणा जिल्हयातील अंबीकापुर गावात काही दिवसापूर्वी दोन कुटुंबामध्ये वाद झाला होता. या घटनेनंतर चितोड येथे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड हे अधिकापुर येथे वाघ कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेले असता त्यांनी दोन समाजात सामंज्य घडविण्या ऐवजी दलित समाजाविषयी अपशब्द वापर कोणी ॲट्रासिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करित असेल तर त्याच्या विरोधात सवर्णानी खंडणी, चोरी, दरोडे असे गंभीर गुन्हे दाखल करावे. जर गुन्हा होत नसेल तर मला सांगा मी दहा हजाराची हत्यारबंद फौज घेऊन त्यांच्यावर हल्ला करतो. माझे कोणीही काही करु शकत नाही. दलित समाजाचा आत्मसम्मान व भावना दुखावल्याप्रकरणी आ. संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावा नसता रिपब्लीकन सेनेच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा देखील निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे.
निवेदनावर जिल्हाध्यक्ष लिंबाजी वाहुळकर, जि. संपर्क प्रमुख अण्णासाहेब चित्तेकर, जिल्हा महासचिव चंद्रकांत खरात, जि.अ. कामगार आघाडी सुरेश वानखेडे, जि. उपाध्यक्ष अरूण म्हस्के, बबन साबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *