ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कोरोणाच्या बाबतीत देश अलर्ट मोडवर तरीही निवडणूका जाहीर!हे चाल्लय तरी काय!

January 13, 202214:24 PM 49 0 0

देशात करोना व ओमायक्रॉनचे रूग्ण दिवसेंदिवस वाढतच असल्याने सर्वांची चिंता वाढली आहे.दिनांक 10 जानेवारीला 24 तासात 1 लाख 60 हजार करोना बाधीत रूग्ण आढळून आले.त्याच प्रमाणे एकाच दिवसात ओमायक्रॉनचे 552 रूग्ण आढळून आले.म्हणजेच भारतात तीसऱ्या लाटेने पाय रोवल्याचे स्पष्ट दिसुन येते.त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयात 4 न्यायाधीश 150 कर्मचारी अशाप्रकारे करोनाचा प्रभाव वाढतच आहे.म्हणजेच परीस्थिती कठीण व चिंताजनक होतं आहे.अशा कठीण परिस्थितीत निवडणुका जाहीर करने म्हणजे करोना व ओमायक्रॉनला खुले आमंत्रण निवडणुक आयोग देत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, हिमाचल प्रदेश, दिल्ली या राज्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.म्हणजेच अर्धाभारत सध्याच्या परिस्थितीत करोनाच्या चपेटमध्ये आल्याचे दिसून येते.यावरून स्पष्ट होते देशांत करोना व ओमायक्रॉनने आपले जाळे विणायला सुरुवात केली आहे.त्यामुळे यावर सावधगिरी अत्यंत महत्त्वाची आहे.परंतु निवडणुक आयोगाने करोना व ओमायक्रॉनला दरकीनार करून उत्तरप्रदेश, गोवा, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर या राज्यात 10 फेब्रुवारी ते 7 मार्च पर्यंत मतदार होईल व 10 मार्चला निवडणुकीचा निकाल घोषित करण्याचे घोषित केले.ही अत्यंत दुर्दैवी व चिंताजनक बाब असल्याचे मी समजलो.यावरून स्पष्ट होते की एकतर या पाच राज्यांत करोना व ओमायक्रॉन नाही किंवा सरकारला आणि निवडणूक आयोगाला लोकांची चिंता नाही.कारण निवडणुका म्हटले की सोशल डिस्टिंक्शन, मास्क,सॅनिटायझर आणि करोनाचे संपूर्ण नियम याची धज्जीया उडवून संपूर्ण नियम धुऱ्यावर रहाणार हे नक्कीच दिसत आहे.करोना व ओमिक्रॉनचा धोका वाढत असल्याचे सरकारच सांगत आहे मग निवडणुका कशा काय जाहीर केल्यात.सध्या देशात निवडणुकींची आवश्यकता नव्हती तर ओमिक्रॉनला व करोनाला रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज होती.परंतु निवडणुक आयोगाने निवडणूका जाहीर करून करोना व ओमायक्रॉनला खतपाणी घालत असल्याचे दिसून येते आणि राजकीय पुढारी याला दुजोरा देत असल्याचे दिसून येते.राजकीय पुढारी लोकांना करोना महामारी व ओमिक्रॉनचा वाढता धोका पहाता लोकांना गाईडलाईन किंवा सल्ला देतात आणि राजकीय पुढारी सत्ता हस्तगत करण्यासाठी व राजकीय पोळी शेकण्यासाठी संपूर्ण करोना नियमांचे उल्लंघन करतांना दिसत आहे ही चिंताजनक बाब आहे.ओमायक्रॉनची खबरदारी नागरिकांनीच घ्यावी काय? निवडणुक आयोग, सरकार व राजकीय पुढाऱ्यांनी का घेवू नये?देशात सर्वप्रथम गर्दीला जबाबदार राजकीय पुढारीच आहेत.कारण राजकीय पुढाऱ्यांनीच येणाऱ्या विधानसभा निवडनुकांना सर्वप्रथम प्राधान्य दिल्याचे दिसून येते.राजकीय पुढाऱ्यांना निवडणुकीची काळजी जास्त व सर्वसामान्यांची काळजी नसल्याचे दिसून येते.निवडणुक आयोग करोना काळात ठरल्या वेळेनुसार निवडणुका घेत आहेत.दुसरीकडे केंद्र व राज्य सरकार सांगत आहे की करोना व ओमिक्रॉनचा धोका वाढतो आहे.मग खरे कोण आणि खोटे कोण!भारतातील ओमिक्रॉनच्या धोक्याबद्दल सरकार,डब्लुएचओ व भारतीय आरोग्य संघटना ज्या प्रमाणे ओमायक्रॉन वाढल्याचे सांगत आहे त्याप्रमाणे निवडणूक आयोग व सरकारच स्वतःच संपूर्ण नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे दिसून येते.पाच राज्यातील निवडणुका पहाता प्रचालाचा मोठ्या प्रमाणात घुमजाव सुरू आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पुढारी किंवा सरकार जाहीर सभा किंवा भेटिगाठी घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुरूवात झाली आहे.यामुळे कोरोना व ओमायक्रॉनचा धोका वाढणार हे स्पष्ट दिसुन येते.देशाची राजधानी दिल्ली व आर्थिक राजधानी मुंबई येथील करोना व ओमायक्रॉनचा वाढता धोका चिंताजनक आहे.त्यामुळे सर्वप्रथम करोना नियमांचे पालन राजकीय पुढाऱ्यांनी करावे नंतर नागरिकांना नियमांचा धडा शिकवावा.कारण राजकीय पुढारी व सरकार स्वतःच संपूर्ण नियमांचे धज्जीया उडवुन राजकारण करतात मग सर्वसामान्य नागरिक काय करणार? त्यामुळे तिसऱ्या लाटेला कसे रोखायचे हे सर्वप्रथम राजकीय पुढाऱ्यांनी व सरकारनेच ठरवायचे आहे.त्याचप्रमाणे निवडणुक आयोगाने पाच राज्यांतील निवडणुकां पुढे न ढकलता करोना काळात निवडणुका घेत असल्याने देशाची चिंता आणखीनच वाढवीली आहे. मी देशातील नागरिकांना विनंती करतो की निवडणुक आयोग किंवा राजकीय पुढारी काय करीत आहे याकडे लक्ष न देता सर्वांनीच करोना नियमांचे काटेकोरपने पालन करावे.घराच्या बाहेर निघताना लहान-मोठ्यांनी मास्क घालूनच बाहेर निघावे यामुळे करोनाचा व वाढत्या प्रदूषणाचा धोका यावर नियंत्रण ठेवण्यास मोठी मदत होईल.त्याचप्रमाणे सोशलडिस्टीग व बाहेरच्या खान-पानवर आळा घालावा.सध्याच्या कठीण घडीला “आरोग्य हिच संपत्ती”हा मुलमंत्र सर्वांनीच जपला पाहिजे.
लेखक.
रमेश कृष्णराव लांजेवार.
माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर)
मो.नं.9921690779, नागपूर.

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *