ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सातारा जिह्यातील काळगाव विभागात पावसाने केलाय कहर शेते भिजली ,चूल विझली,होत्याचे नव्हते झाले….

July 28, 202115:33 PM 52 0 0

सातारा  प्रतींनिधी (सुप्रिया जयभिम कांबळे ) : सातारा जिल्ह्यात पावसाचा कहर सुरूच असून जिल्ह्यातील पाटण तालुक्यात पावसाने हाहाकार उडाला आहे.काळगावसह आजूबाजूच्या गावातील रस्ते, पूल उखडले आहेत, शेतातली उभी पिके वाहून गेली आहेत ,घरांची पडझड झाली आहे . सलग पडणार्‍या पावसाने पाटण तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून विद्युत पुरवठा खंडित झाला आहे .लोकांना संपर्क साधणे अवघड झाले आहे. त्यामुळे मोबाईल स्वीच ऑफ झाल्याने बाहेरून फोन करणार्‍या लोकांची घालमेल सुरू आहे.


सकाळपासून पाऊस ओसरू लागल्याने लोकाना झालेल्या नुकसानीचा अंदाज येऊ लागला आहे. प्रचंड पावसाने लोकाना घराबाहेर पडणे देखील अवघड बनले होते. काळगाव पासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर डोंगरात वसलेल्या जोशी वाडीला पावसाचा तडाखा बसला आहे.
10 ते 12 घरे असलेल्या या छोट्या वस्तीत 50 ते 60 लोक राहतात. काल मध्यरात्री येथील घरांच्या पाठीमागे सुमारे 2 फूट तर घरांच्या पुढे साधारण 20 फुटाच्या अंतरावर मोठी चर पडली आहे त्यामूळे सुरक्षेसाठी येथील लोकाना करपेवाडी शाळेत ठेवले होते.
तसेच काळगाव मधील मराठी शाळेजवळ असलेल्या एका घराला चिरा पडल्यामुळे त्यांना सुरक्षेसाठी दुसर्‍या घरात हलवले आहे. याशिवाय काळगाव मधील पूल, भरेवाडी येथील पूल वाहतूक करण्या योग्य राहिला नाही. रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.
पाटण तालुक्यातील मोळावडेवाडी ,कुठरे येथे पावसाने प्रचंड नुकसान केले आहे. यामधे इलेक्ट्रिक पोल 11 KV पावसामुळे पडला असून विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे तरी विद्युत पुरवठा पाऊस आला नाही तर संध्याकाळपर्यंत पूर्ववत होईल असे महावितरण कडून सांगण्यात आले. तसेच हणमंत काशिनाथ मोळावडे, शांताराम मोरे व आनंद मोरे यांची ऊसाची शेती पूर्ण पावसाने वाहून गेली आहे. सुदैवाने के टीआर बंधारा व्यवस्थित आहे. तसेच सार्वजनिक विहिरी मध्ये पाणी गेले असून सदरची लाईट्स ची यंत्रणा नादुरुस्त झाली आहे . एकंदरीत पावसाने लोकांचे खूप नुकसान झाले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *