ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मार्गशीर्ष महिन्यात पूजेच्या सामुग्री खरेदी साठी महिलांची लगबग

December 23, 202113:38 PM 39 0 0

उरण (संगिता पवार ) मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी महालक्ष्मीची व्रतवैकल्य केले जाते. त्यासाठी उरण बाजारात पूजा साहित्य दाखल झाले आहेत; मात्र अवकाळी पावसाचा फटका बसल्याने फळांच्या किमती वाढल्या आहेत. त्याचबरोबरच पूजा साहित्याच्या किमतीही १० ते १५ टक्क्यांनी महागल्या आहेत. मार्गशीर्ष मासारंभ सुरू झाला आहे. त्यानिमित्ताने प्रत्येक गुरुवारी महिलावर्ग लक्ष्मीदेवीची यथासांग पूजा करतात. घरात सुखशांती लाभावी, लक्ष्मी मिळावी, घरातील सर्वांना आरोग्य लाभावे, या उद्देशाने देवीची मनोभावे पूजा केली जाते.

मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी घरोघरी करण्यात येणाऱ्या पूजेकरिता लागणाऱ्या साहित्याने उरण बाजारपेठ फुलली आहे. बुधवारी साहित्य खरेदीसाठी महिलांनी बाजारात गर्दी केली होती. पूजेसाठी लागणारी पाच फळे, ८० ते १०० रुपये , फळ झाडाच्या डहाळ्या, १० ते २० रुपये फुले २०० रुपये किलो ,, वेणी,२० ते ५० रुपये , नारळ २० ते ४० रुपये केळी ४० ते ५० रुपये डझनदेवीचे , पूजे साठी सामुग्री विकली जात होती असे फळ विक्रते सैपन पटेल यांनी सांगितले .
घरात सुखशांती लाभावी, लक्ष्मी मिळावी, घरातील सर्वांना आरोग्य लाभावे, या उद्देशाने देवीची मनोभावे पूजा केली जाते पूजेला लागणारे साहित्य जरी महाग झाले तरी पूजेसाठी लागणारे साहित्य खरेदी आम्ही करतोच —- सामाजिक कार्यकर्ती रजनी मानापुरे केगाव (उरण ) यांनी सांगितले .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *