ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

 मान्यवरांच्या उपस्थितीत सभा मंडपाचे पूजन लावण्यांचे किमान दोन तरी कार्यक्रम घेणार – भास्करराव दानवे

August 24, 202219:13 PM 11 0 0

जालना : दोन वर्षानंतर जालना गणेश फेस्टीव्हल होत आहे. त्यामुळे सर्वांमध्येच उत्स्फूर्तपणा दिसून येत आहे. हा फेस्टीव्हल उत्स्फुर्तच व्हावा, असेच प्रयत्न सुरु असून यंदाच्या कार्यक्रमात लावणीचे दोन कार्यक्रम घेण्याचा मनोदय फेस्टीव्हलचे अध्यक्ष भास्करराव दानवे यांनी बोलून दाखवला आहे.

जालना गणेश फेस्टीव्हलच्या सभा मंडपाचे उद्घाटन आज विनायक महाराज फुलंब्रीकर यांच्या मंत्रोच्चारात करण्यात आले. त्याप्रसंगी श्री. दानवे बोलत होते. यावेळी मनोज महाराज गौड, कार्याध्यक्ष संजय खोतकर, कोषाध्यक्ष अशोक पांगारकर, राजेंद्र राख, रविंद्र तौर, राजेंद्र गोरे, किरण गरड, सुभाष कोळकर, शरद देशमुख, ज्ञानेश्‍वर माऊली कदम, संजय देठे, सुरेश मुळे, दिनेश फलके, अजिक्य घोगरे, प्रा. राजेंद्र भोसले, अविनाश देशमुख, संतोष गाजरे, प्रशांत वाडेकर, धनराज काबलिये, भाऊसाहेब घुगे, गेंदालाल झुंगे, सिध्दीविनायक मुळे, बद्री पठाडे, गोवर्धन कोल्हे, भागवत बावणे, गुलाब पाटील, शशिकांत घुगे, सगीर रजवी, अशोक उबाळे, सुपारकर, चंद्रशेखर वाळिंबे, गणेश मोहिते, अमोल ठाकूर, संदीप गिदोडीया, सुशिल भावसार, सागर पाटील, अस्लम शेख, दिपक वैद्य, रवी खरात, चंदू निर्मल, सुशिल भावसार आदींची उपस्थिती होती. पुढे बोलतांना श्री. दानवे म्हणाले की, हा फेस्टीव्हल अत्यंत बहारदारपणे साजरा व्हावा, तो जनतेच्या लक्षात राहावा, असाच प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी प्रत्येकाच्या सूचनांचा आदर करण्यात येत आहे.

हा फेस्टीव्हल अत्यंत चांगल्या प्रकारे साजरा व्हावा यासाठी यासाठी समितीचे प्रयत्न असून सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच महाराष्ट्राची लावणी आता महिलांमध्येही लोकप्रिय होत आहे. यापूर्वीही या फेस्टीव्हलमध्ये लावणीचे कार्यक्रम झाले आहेत. त्यामुळे यंदा लावणीचा एक नाही तर दोन कार्यक्रम घेण्याचा मानस आहे. हा फेस्टीव्हल आपल्या सर्वांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडेल, असा विश्‍वासही श्री. दानवे यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. राजेंद्र भोसले यांनी बहारपणे केले. यावेळी फेस्टीव्हलचे आजी- माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *