ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सध्याच्या काळामध्ये शिक्षणाबरोबरच खेळाकडे लक्ष देण्याची गरज

September 1, 202112:55 PM 78 0 0

सातारा (विदया निकाळजे) : सध्याच्या काळामध्ये शिक्षणाबरोबरच खेळाकडे लक्ष देण्याची गरज असून कुस्तीसारख्या खेळाची परंपरा जिल्हा परिषद केंद्र शाळा पिंपरीने जपल्यामुळे शाळेमधून शिक्षणाबरोबरच खेळाचा ही विकास होईल  असे मत शिक्षण तज्ञ आप्पासाहेब राजगे सर यांनी व्यक्त  केले. सातारा जिल्ह्यातील पैलवान अमोल नरळे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून जांभुळणी ता.माण येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत केंद्रशाळा पिंपरी येथील इयत्ता 6 वी मधील विद्यार्थी धनराज भोलेनाथ राजगे याने 25 किलो वजन गटात द्वितीय क्रमांक संपादन केल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला.तसेच अर्जुन बागल यानेही  कुस्तीस्पर्धेत चांगली कामगिरी केल्याने उपस्थितांच्या हस्ते श्रीफळ देऊन फेटा बांधून सत्कार करण्यात आला.

यावेळी या  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे हनुमान कुस्ती केंद्राचे कुस्ती कोच निलेश तरंगे,गणेश कुंकुले यांचाही सत्कार करण्यात आला. सध्या शिक्षणासोबत खेळाचाही विकास होण्याची गरज असून पिंपरी गावाला शेकडो वर्षांपासून कुस्ती ची परंपरा असल्यामुळे पुन्हा कुस्तीला चांगले दिवस येतील असे कुस्ती कोच निलेश तरंगे यांनी सांगितले. तसेच ज्या व्यक्तींना आपल्या मुलांना कुस्ती खेळात करिअर करायचे आहे त्यांनी हनुमान कुस्ती केंद्र पिंपरी येथे संपर्क साधावा असे आवाहन केले.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोनाजी राजगे,आप्पासाहेब राजगे सर,डॉ दिलीप राजगे शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी कुस्तीप्रेमी संजय कुर्ले आजी माजी कुस्तीपट्टू आणि सर्व शिक्षक स्टाफ,उपस्थित होते. प्रास्ताविक अविनाश शिंदे सर,सूत्रसंचालन सुरजकुमार निकाळजे,  मुख्याध्यापक दाजीराम गोरड यांनी आभार मानले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *