ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरण परिसरात शासकीय अधिकाऱ्यांच्या वरदहस्ताने अवैध बांधकामांना ऊत : भांडवलदार, विकासकाकडून सीआरझेड, शासकीय नियमांचे खुलेआम उल्लंघन

September 7, 202113:18 PM 66 0 0

उरण (संगिता पवार ) : उरण तालुक्यातील ग्रामीण भागात सीआरझेड, वन, महसुली आणि खासगी क्षेत्रात शासकीय नियमांना धाब्यावर बसवून भांडवलदार , विकासकांची मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकामे सुरू आहेत.अवैधरित्या सुरू असलेल्या शेकडो ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामांना संबंधित शासकीय अधिकाऱ्यांचाच वरदहस्त असल्याने अवैध बांधकामांचा वारु बेफामपणे उधळतच चालला आहे. नवी मुंबई विमानतळ,न्हावा-शेवा शिवडी सि-लिंक, खोपटा शहर, नैना प्रकल्प,नेरुळ-उरण रेल्वे प्रकल्प उरणच्या हाकेच्या अंतरावर आहे.त्यामुळे होऊ घातलेल्या विविध प्रकल्पांमुळे उरणच्या जमिनीला सोन्याचा भाव आला आहे.त्यामुळे शेकडो विकासक, भांडवलदारांनी उरण परिसरातील चाणजे, द्रोणागिरी खोपटा, कोप्रोली,सारडे,आवरे,पिरकोन,कळंबुसरे, चिरनेर, भोम,चिरनेर,बोरखार, विंधणे ,कंठवली ,दिघोडे, रानसई ,जांभुळपाडा, चिर्ले,धुतुम,सुरुंग पाडा, रांजणपाडा, जासई आदी अनेक ठिकाणी खासगी येथील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर जमिनी खरेदी केल्या आहेत.


अशा शेतकऱ्यांकडून कायदेशीर, बेकायदेशीरपणे खरेदी करण्यात आलेल्या शेकडो हेक्टर जमिनींवर प्लाट,बंगले, इमारती,रो हाऊसेस उभारण्यात येत आहेत. ग्राहकांना अगदी स्वतात देण्यात येणार असुन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या जाहिराती केल्या जात आहेत.यासाठी खासगी जागांबरोबर उरण तालुक्यातील ग्रामीण भागातील सीआरझेड, वन, महसुली आणि खासगी क्षेत्रात शासकीय नियमांना धाब्यावर बसवून भांडवलदार , विकासकांची मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत.
अशी ही बेकायदेशीरपणे बांधकामे करताना भांडवलदार ,विकासकाकडून शासकीय नियम धाब्यावर बसवले जात आहेत.अंधाराचा फायदा उठवत मोठ्या प्रमाणात नैसर्गिक खाड्या, नाल्यांवर माती दगडांचे भराव टाकून बुजविण्यात येत आहेत. मॅग्रोज, कांदळवनांची मोठ्या प्रमाणात कत्तलही केली जात आहे.ही कामे रात्रीच्या अंधारात करण्यासाठी विविध राजकीय स्थानिक नेत्यांना हाताशी धरून कामे केली जात आहेत.रात्रीच्या अंधारात अशी बेकायदेशीर कामे करण्यासाठी राजकीय पुढारी ठेकेदारांनाच कामे दिली आहेत. तसेच अशी बिनबोभाट कामे सुरळीत पार पाडण्यासाठी राजकीय दलालांचीही भरती करण्यात आली आहे.अशा या दलालांवर फक्त शासकीय यंत्रणेला खुष करण्याची आणि स्थानिक अडथळे दूर करण्याची कामे सोपविण्यात आली आहेत.यामध्ये विकासक, भांडवलदारांकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अनेक प्रकरणे पोलिस, तहसीलदार यांच्याकडे दाखल करण्यात आलेली आहेत.शासकीय यंत्रणाही अशा विकासक, भांडवलदारांच्या ताटाखालचे मांजर बनलेले असल्याने फक्त बेकायदेशीर बांधकामांना
नोटीस बजावण्याचेच काम करीत आहे.शासकीय यंत्रणेच्या अशा कागदावरील कारवाईवर परिसरातील नागरिकांकडून जोरदार टीका केली जात आहे.

उरण तालुक्यातील अनेक ठिकाणी सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांना आळा घालण्यासाठी आणि अतिक्रमण रोखण्यासाठी नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.तसेच फसव्या जाहिरातींना बळी न पडता ग्राहकांनीही जागा,जमीन, प्लांट खरेदी करताना डोळसपणे चौकशी करावी.खातरजमा, खात्री पटल्यानंतरच जमींनींचे व्यवहार करावेत.तसेच उरण परिसरात होत असलेल्या बेकायदेशीर बांधकामांवर लवकरच कारवाई करण्यात येईल.

भाऊसाहेब अंधारे
उरण तहसीलदार

वन विभागाच्या जागेत बेकायदेशीरपणे बांधकामे करुन अतिक्रमण करणाऱ्या विकासक, भांडवलदारांवर गुन्हे दाखल करण्यात येतील.मोठी जुई येथील एका प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच कांदळवन, मॅग्रोजची बेकायदेशीर तोड करणाऱ्यांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.तसेच काही खासगी प्रकरणांमध्ये कारवाई करण्यासाठी पोलिस, तहसिलदारांचीही मदत घेतली जात आहे.

 शशांक कदम
उरण वनक्षेत्रपाल

शेतकरी, नागरिक, ग्राहकांनी शेतजमीन खरेदी-विक्री करताना फसवणूक होणार नाही याची दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. परिसरातील शेतकऱ्यांची भांडवलदारांकडून होणाऱ्या फसवणूकीच्या काही तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत. तक्रारी नंतर काही विकासकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहे.

रवींद्र बुधवंत,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
उरण पोलिस ठाणे

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *