ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

योगेशनगर येथे लसीकरण मोहिम सुरू तीन दिवसात 300 जणांनी घेतली लस

September 21, 202113:26 PM 6 0 0

जालना (प्रतिनिधी) : शहरातील योगेशनगर, भग्योदयनगर प्रभाग 29 मध्ये मागील तीन दिवसापासून लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला असून पुढील पाच दिवस संपुर्ण प्रभागात सदर मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती काँग्रेस कमिटीचे शहर उपाध्यक्ष फकीरा वाघ यांनी दिली आहे.


सदरील मोहीम आमदार कैलास गोरंट्याल व नगराध्यक्षा सौ. संगीताताई गोरंट्याल यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येता आहे. काँग्रेस कमिटीचे शहर उपाध्यक्ष फकिरा वाघ यांनी प्रत्येक गल्लो-गल्ली जाऊन लसीकरण मोहिमेची जनजागृती केली. दि. 25 सप्टेंबर पर्यंत पर्यंत पोलीस कॉटर, टिव्ही सेंटर, यशोदीपनगर, वडाळेवाडी, सत्तारेनगर या भागात लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन काँग्रेस कमिटीचे शहर उपाध्यक्ष फकीरा वाघ यांनी केले.
लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी काँग्रेस कमिटीचे शहर उपाध्यक्ष फकिरा वाघ, वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता राजे देशमुख, पी. एस. गेडाम, आशा वर्कर रूपाली कोकणे, कुसुम मोकरे, आर. आर. तोटे, शारदा सदगुरे, रामलाल तेली, विजय घाटोळे आदींनी परिश्रम घेतले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *