ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरणच्या शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयातील गैरसोयींमुळे रुग्णांची संख्या निम्म्याने घटली : उरणकरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

March 26, 202213:04 PM 29 0 0

उरण ( संगिता पवार ) : उरणच्या दोन लाख नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाला सध्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांची उणीव आणि गैरसोयींनी ग्रासले आहे.त्यामुळे उपचारासाठी दाखल होणाऱ्या गरीब गरजू बाह्य व प्रसृतीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या निम्म्याने घटली आहे. वाढत्या औद्योगिक पसाऱ्यामुळे देशाची दुसरी आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाणाऱ्या उरणच्या दोन लाख नागरिकांना दररोज आरोग्य जपण्यासाठी कसरत करावी लागत आहे. उरणच्या शहरी व ग्रामीण जनतेसाठी उपयुक्त असणाऱ्या ३० खाटांच्या शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय सध्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या कमतरता आणि रुग्णालयातील अनेक गैरसोयींमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
कोरोना महामारी आधी शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात दररोज उपचारासाठी येणाऱ्या गरीब गरजू बाह्यरुग्णाची संख्या २२५-२५० पर्यंत होती.मागील दोन वर्षांतील कोरोना काळात ५०-७५ पर्यंत तर कोरोना निर्बंध शिथिलतेनंतर आता बाह्यरुग्णांची संख्या १२५-१५० पर्यंत घसरली आहे. प्रस्तृतीसाठी दाखल होणाऱ्या महिलांची संख्या कोरोनाआधी महिन्याकाठी ४०-४५ पर्यंत होती.आता मात्र महिन्यांकाठी प्रसृतीसाठी दाखल होणाऱ्या महिलांची संख्या १५ वर येऊन ठेपली आहे.सिंझरिंग व अडचणीच्या ठरणाऱ्या केसेस उपचारासाठी पनवेल, नवीमुंबई, मुंबईकडे पाठविण्यात येतात. आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे अशा गरीब गरजूसाठी खासगी रुग्णालय अथवा बाहेर जाऊन उपचार करून घेणे आवाक्याबाहेर आणि कठीण ठरते.
शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात अनेक सध्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांची उणीव आणि गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. रुग्णालयासाठी वैद्यकीय अधीक्षक-१, वैद्यकीय अधिकारी -३ अशी एकूण चार पदे मंजूर आहेत. मात्र मागील २७ वर्षात २०१२-१३ सालातील एकदोन वर्षांचा कालावधी वगळता अद्यापही वैद्यकीय अधीक्षक पदावर कायमस्वरूपी अधिकारी नियुक्त करण्यात आलेला नाही.क्लास-४ पदाच्या ७ मंजूर जागा पैकी अद्यापही तीन जागा रिक्त आहेत.स्त्रीतज्ञ, भुलतज्ञ नसल्याने शस्त्रक्रिया विशेषतः प्रस्तुतीसाठी येणाऱ्या महिलांवर उपचार करणे अवघड होऊन बसते. सोनोग्राफी , ईसीजी अभावी रुग्णांवर उपचार करणे जिकिरीचे झाले आहे.जेएनपीटी बंदरातून दररोज वीस हजार कंटेनर मालाची वाहतूक होत आहे.इतक्या प्रचंड प्रमाणात होणाऱ्या कंटेनर मालाच्या वाहतूकीमुळे दररोज अपघातांची संख्या मोठी आहे.अशा अपघातग्रस्त रुग्णही मोठ्या प्रमाणात उपचारासाठी दाखल केले जात असल्याने इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयावर त्याचा ताण वाढत चालला आहे.महागड्या खासगी रुग्णालयाची फी परवडत नसल्याने परिसरातुन विविध आजारांवर उपचार करून घेण्यासाठी गरीब-गरजु रुग्ण येतात. मात्र रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे गरीब रुग्णांना योग्य प्रकारे उपचार करणे शक्य होत नाही.
त्यामुळे रुग्णालयातील उणीवा, गैरसोयींचा सर्वाधिक फटका दररोज रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या हजारो सर्वसामान्य गरीब-गरजु रुग्णांना बसत आहे. त्यामुळे उरणच्या आरोग्य सेवेबाबत परिसरातील नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रभारी पदावरील वैद्यकीय अधिक्षकांना रुग्णांवर उपचार करून घेण्याऐवजी मुंबई,ठाणे, अलिबाग येथील आरोग्य विभागाच्या विविध बैठकांना उपस्थित राहावे लागते.तसेच रुग्ण तपासणीपेक्षा कार्यालयीन कामकाजासाठी अधिक प्राधान्य द्यावे लागते.त्यामुळे बाह्य रुग्णांचा भार उर्वरित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर पडत आहे.त्यामुळे दररोज उपचारासाठी रुग्णालयात येणाऱ्या बाह्य रुग्णांवर उपचार करणे शक्य होत नाही.यामुळे होणाऱ्या दुष्परिणामुळे गरीब रुग्णांना वेळीच उपचार मिळत नाहीत. परिणामी उपचारासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनाच गरीब रुग्णांना बाहेरचा रस्ता दाखविण्याची वेळ येते.
उरण तालुक्याला ३० हजार लोकसंख्येच्या मागे एक प्राथामिक आरोग्य केंद्राची आवश्यकता आहे.मात्र सुमारे २ लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या उरण तालुक्यात आरोग्य सेवेसाठी फक्त एक शासकीय रुग्णालय तर एक प्राथामिक आरोग्य केंद्र आहे. उर्वरित प्राथमिक केंद्र मंजुरीनंतरही अद्यापही कागदावरच आहेत. १०५ कोटी खर्चाचे १०० खाटांचे मल्टीस्पेशालिटी हॉपीटल उद्घाटनाच्या आठ वर्षांनंतरही उभारणीच्या प्रतिक्षेत आहे.
गरीब-गरजु रुग्णांवर तातडीने आणि योग्य प्रकारे उपचार करून घेण्यासाठी रुग्णालयातील रिक्त पदे तत्काळ भरण्याची आवश्यकता आहे. गैरसोयी दूर करण्याची गरज आहे. यासाठी रुग्णालयाकडून मागील अनेक वर्षांपासून केली जात आहे.कोरोनाचे निर्बंध उठविण्यात आल्यानंतर बाह्य रुग्णांची घसरणीला लागलेली रुग्ण संख्या आता वाढीस लागली आहे.प्रसृतीच्या केसेसही वाढत असल्याची माहिती इंदिरागांधी ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक गौतम देसाई यांनी दिली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *