ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

इन्क्युबेशन व इनोव्हेशन आणि विज्ञान संशोधन केंद्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

November 3, 202116:35 PM 37 0 0

बारामती (विद्या निकाळजे)  : इन्क्युबेशन व इनोव्हेशन आणि विज्ञान संशोधन केंद्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, सौ.रश्मी ठाकरे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार,  उद्योजक बाबा कल्याणी, विजय शिर्के,  दिपक छाब्रिया, प्रतापराव पवार, ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार आदी उपस्थित होते.

ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टतर्फे  बाल वैज्ञानिक घडविण्यासाठी सायन्स अँड इनोव्हेशन ॲक्टिव्हिटी सेंटर  उभारण्यात आले आहे. विविध राज्यस्तरीय वैज्ञानिक आणि शैक्षणिक संस्थामध्ये शालेय विद्यार्थ्यांना नेऊन त्यांची विज्ञानाबद्दल जिज्ञासा वाढविणे, योग्य शैक्षणिक दिशा देणे, विज्ञान सोपे आणि सहज करुन शिकवता येईल अशा प्रयोगासाठी उपयुक्त कीट विविध शाळांमध्ये वाटप आणि शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याच विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण संकल्पना सोबतच व्यासपीठ , संशोधनाकडे वळविणे यासाठी या केंद्रांच्या माध्यमातून काम होणार आहे.  मुलांमध्ये कौशल्य विकसन व्हावे या दृष्टीने आभासी माहिती  तंत्रज्ञान, रोबोटिक्स तंत्राचा प्रत्यक्ष निरीक्षणातून अनुभव घेण्याची सुविधा या केंद्रामध्ये उपलब्ध आहे.   विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये देखील विज्ञानाची आवड निर्माण होण्यासाठी हे सेंटर उपयुक्त ठरणार आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *