जालना ( प्रतिनिधी) : जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत हरभरा खरेदी केंद्राचे उद्घाटन शिवसेना नेते, माजी मंत्री तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते मंगळवारी ( ता. २३)करण्यात आले.
शेतकऱ्यांनी आधारभूत किमती योजनेचा लाभ घेऊन हरभरा विक्रीसाठी आणावा .असे आवाहन सभापती अर्जुनराव खोतकर यांनी यावेळी बोलताना केले. हरभरा प्रथम विक्रीस आणणारे शेतकरी अर्जुन येवले ( रेवगाव) यांचा सभापती श्री. खोतकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पंडीतराव भुतेकर, बाजार समितीचे प्रभाकर जाधव मोहन राठोड जडाई माता प्रोडूसर शेतकरी कंपनीचे अंकुश परकळ, सूर्यकांत कदम ,प्रल्हाद जाधव आदींची उपस्थिती होती.
Leave a Reply