नवी मुंबई प्रतिनिधी (रेखा चिरनेरकर) : दिनांक 23 जुलै 2021 रोजी साई मंदिर, वहाळ इथे संपन्न झाला. या कार्यक्रमास अनेक मान्यवर व्यक्तींनी उपस्थिती दिली होती. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे माननीय डॉ. सागर गुंडेवार (AG) आणि श्री. रविंद्र पाटील (Foundation Chair) सनराईस क्लबचे प्रमुख श्री राजू मुंबईकर यांच्या आणि इतर मान्यवरांच्या सत्काराने झाली.
यानंतर पनवेल मधील RC पनवेल महानगर रोटरी क्लबचे प्रेसिडेंट आणि सेक्रेटरी यांचाही सत्कार करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ उलवे नोडचे माजी सेक्रेटरी मा. श्री. जयंत म्हात्रे यांनी मागील वर्षाच्या प्रकल्पाचा तपशील सादर केला. त्यानंतर प्रमुख पाहुणे डॉ. सागर गुंडेवार यांनी क्लबला उद्देशून मार्गदर्शन केले. डिस्ट्रिक्ट गव्हर्नर श्री. पंकज शहा यांनी zoom च्या माध्यमातून क्लबला शुभेच्छा दिल्या. फौंडेशन चेअर श्री. रवींद्र पाटील सरांनी सर्वाना मार्गदर्शन केले तसेच आतापर्यंत केलेल्या कामांची माहिती दिली.
यावर्षीच्या प्रेसिडेंट मा. शिरीष कडू यांनी प्रेसिडेंट पदाची स्वीकृती ग्रहण केली. तसेच, श्री निलेश सोनवणे यांनी सेक्रेटरी पदाची स्वीकृती ग्रहण केली. श्री.अजय दापोलकर, श्री निलेश ठाकूर , सौ. रेखा चिरनेरकर, श्री. नितीन आढाव, श्री. अमित कुचेकर, श्री. सचिन मोरे, श्री. मुकुंद थळे आणि श्री शेखर काशिद या सर्वांनी बोर्ड ऑफ डायरेक्टर पदाची स्वीकृती केली. तसेच इतर मेंबर आणि नवीन मेंबरचे देखील स्वागत करण्यात आले.
सेक्रेटरी श्री. निलेश सोनवणे यांनी येणार्या नवीन वर्षात राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांची माहिती सर्वांना दिली.
प्रेसिडेंट श्री शिरीष कडू यांनी सर्वांचे आभार प्रदर्शन करत कार्यक्रमाची सांगता केली. रोटेरियन रेखा चिरनेरकर आणि श्री.सचिन मोरे यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले.
Leave a Reply