उरण ( प्रतींनिधी अश्विनी धोत्रे. ) : तालुक्यांतील पागोटे गावातील शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस कामगार नेते मा. मेघनाथ विठोबा तांडेल व मा. रायगड जिल्हा परिषद सदस्या सौ. मिनाक्षी तांडेल यांचे सुपुत्र मा. डॅा. सागर मेघनाथ तांडेल, एम.बी.बी.एस.,एम.डी. ( जनरल मेडिसिन ) गोल्ड मेडयालिस्ट, डी.एम. कार्डिओलॅाजी म्हणून प्राविण्य मिळविले आहे. गोरगरीबांसह भूमिपुत्रांच्या सेवेकरिता आई-वडीलांनी पाहिलेलं स्वप्न आज प्रत्यक्षात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व व्यावसायीक मान्यवरांच्या उपस्थितीत गुरूवार, दि. २२.०७.२०२१ रोजी डॅा. सागर तांडेल यांनी ह्रदयरोग तज्ज्ञ म्हणून सर्वांच्या आशिर्वादाने मुहूर्त केलं.
उरण तालुक्यांत शॅाप नं. ७&८, मॅजेस्टिक व्हिला, सेक्टर – ५०, प्लॅाट नं. १५९, द्रोणागिरी नोड, उरण येथे प्रथमच प्रकल्पग्रस्त / भूमिपुत्र, स्थानिकांसह सर्वांच्या हक्काचे “ ट्रुलाईफ ॲडवांस हर्ट क्किनिक ( TRULIFE ADVANCED HEART CLINIC) सेवेकरिता कार्यरत झाल्यामुळे पंचक्रोशीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या पुढील कार्यास उरणतालुक्यासह पंचक्रोशिवाशियांनकडून खुप सा-या भरभरून शुभेच्छा .
Leave a Reply