ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

लोधीमोहल्ला, दरगाह दरवाजा येथील सिमेंट रस्त्याच्या कामाचे नगरसेवक विष्णु पाचफुले यांच्याहस्ते उद्घाटन

January 11, 202212:41 PM 46 0 0

जालना (प्रतिनिधी) : शहरातील लोधीमोहल्ला दरगाह दरवाजा प्रभाग क्रं. 20 येथील सिमेंट रस्त्याच्या कामाचे उद्घाटन शिवसेनेचे नगरसेवक तथा शहर प्रमुख विष्णु पाचफुले यांच्याहस्ते करण्यात आले. शहरातील लोधीमोहल्ला, दरगाह दरवाजा या भागात शिवसेनेचे नगरसेवक विष्णु पाचफुले यांच्याकडून सिमेंट रस्ते आणि अंडरग्राऊंड नाल्यांचे काम करण्यात आले असून वरिष्ठ पत्रकार लियाकत अली खान यांच्या घरासमोरून ते नदीच्या काठापर्यंत राहिलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामास नुकताच शुभारंभ करण्यात आला आहे. या रस्त्याकामाचे उद्घाटन नगरसेवक विष्णू पाचफुले यांच्याहस्ते करण्यात आले आहे.

यावेळी शिवसेनेचे नगरसेवक तथा शहर प्रमुख विष्णू पाचफुले यांनी बोलतांना सांगीतले की, प्रभाग क्रं. 20 मधील छोट्या-मोठ्या गल्लीमध्ये सिमेंट रोड, अंडरग्राऊंड नाल्या व पाईपलाईनचे या पाच वर्षामध्ये सर्व काम करण्यात आलेले आहे. तसेच प्रभागामध्ये अनेक विकास कामे करून प्रभागाचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. जी काही राहिलेली विकास कामे ही जनता जनार्धनाच्या आशिर्वादाने पुर्ण करणार असल्याचे विष्णू पाचफुले यांनी सांगीतले. यावेळी पत्रकार लियाकत अली खान, माजी नगरसेवक प्रताप भैय्या वर्मा, लालाभैय्या वर्मा, राधेशाम शरानी, जयपालसिंग वर्मा, राजुसिंग सुर्यवंशी, अनिलसिंग सुर्यवंशी, निलेशसिंग सुर्यवंशी, लक्ष्मणसिंग वर्मा, बालाजीसिंग राजपुत, प्रभुसिंग राजपुत, चतुरसिंग वर्मा, प्रकाश घोडे पाटील, पांडुरंग खैरे, रामनाथ भुतेकर, रामभाऊ खांडेभराड, अशिष पाचफुले आदींची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *