प्रतिनिधी जालना (अनिता पवार) जालना शहरात संगीत कलेचा विकास व्हावा या उद्देशाने “ज्ञानजोत” शिक्षण संस्थेने “हंसध्वनी भारतीय संगीत अकादमी” सुरु केली असून नुकतेच या संगीत अकादमीचे उद्घाटन योगेश नगर येथे मा.आ.कैलास गोरंट्याल, नागराध्यक्षा संगिताताई गोरंट्याल तसेच ज्ञानजोत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. बायस सर यांच्या हस्ते नुकतेच पार पडले.
जालना जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाडयात एकमेव असणाऱ्या या संगीत अकादमीत, वेगवेगळे कौशल्य हे एकाच ठिकाणी शास्त्रीय पद्धतीने शिकवल्या जाणार असून डिजिटल तंत्रज्ञानाचा चा वापर यामध्ये होणार आहे. लांबून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बसची व्यवस्था असणार आहे. सी सी आर टी तसेच शासनाच्या आकाशवाणी सहित विविध Indian Idol (Sont TV) , सा रे ग म प (ZEE TV) सारख्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मुलांना कर्तुत्व दाखवण्याची संधी यातून उपलब्ध होणार आहे. या व यासारख्या विविध अंगानी महत्त्वपूर्ण असलेल्या संगीत अकादमीला संगीत प्रेमींनी सकाळी 11 ते सायंकाळी 05 दरम्यान अवश्य एकदा भेट द्यावी असे आवाहन संगीत अकादमीचे संचालकांनी केली आहे.
Leave a Reply