जालना :-दि. 4 फेब्रुवारी 2021 ते 15 फेब्रुवारी 2021 या कालावधीत महा- रेशीम अभियान राबविण्यात येणार आहे. या योजनामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण विकास योजना, POCRA, जिल्हा वार्षिक योजनाचे लाभाविषयी माहिती निवडलेल्या गावात रेशीम रथ व रेशीम कर्मचारी प्रत्यक्ष कार्यक्रम घेवून रेशीम योजनाचे फायदे, वैशिष्टे, रेशीम विकास योजनाबाबत सन 2021-22 करीता नवीन तुती लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे.
तरी या महा- रेशीम अभियान 2021 साठी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या शुभ हस्ते दि. 8 फेबुवारी 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता साखर कारखाना, अंकुश नगर येथे महा-रेशीम रथाचे फित कापून व नंतर हिरवा झेंडा दाखवून रथ प्रचार व प्रसिध्दी करीता रवाना होणार आहे. असे रेशीम विकास अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
Leave a Reply