ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ

October 25, 202113:32 PM 8 0 0

सातारा, दि.24 ( विद्या निकाळजे) : सह्याद्री सहकारी साखर कारखाना लि. यशवंतनगर या साखर कारखान्याचा सन 2021 -22 च्या 48 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ सहकार व पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.


या शुभारंभाप्रसंगी कारखान्याचे संचालक सुरेश माने, सातारा जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे यांच्यासह विद्यमान संचालक व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. या वर्षी सह्याद्री साखर कारखान्यामार्फत जास्तीत जास्त गाळप होण्यासाठी प्रयत्न केला जाईल. यासाठी ऊसतोड मजूरांसह कारखान्याची सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे श्री पाटील यांनी यावेळी सांगितले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *