ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

शिव सई आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन

January 6, 202212:32 PM 44 0 0

उरण (संगींता पवार ) : उरण चारफाटा जवळ शिव सई आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन महसूल नायब तहसिलदार उरण नरेश पेढवी यांच्या हस्ते मंगळवार ( दि. ४ ) रोजी झाले . शिव सई आपले सरकार सेवा केंद्राचे संचालक स्वाती मिथुन म्हात्रे यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले . शिव सई आपले सरकार सेवा केंद्रा मध्ये सर्व प्रकारचे दाखले मिळतील त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन महसूल नायब तहसीलदार नरेश पेढावी यांनी उद्घाटन प्रसंगी केले .

या प्रसंगी महसूल नायब तहसिलदार उरण नरेश पेढवी,तहसील कार्यालयातील शिवनाथ गिरी ,कुंजल पाटील , स्वाती मिथुन म्हात्रे ,चाणजे ग्रामपंचायत सदस्या उज्वला जगदीश म्हात्रे ,जगदीश म्हात्रे ,गणेश ,म्हात्रे ,माजी सर्कल अधिकारी अनिल म्हात्रे ,रुपेश पाटील, अॅड,प्राची पाटील ,हरेश्वर ठाकूर ,समीर थळी ,मिथुन म्हात्रे ,नितेश घरत , सुनील म्हात्रे ,सचिन ठाकूर ,अविनाश चोरघे ,जिजा चोरघे ,सचिन ठाकूर ,दिपक हिंगमिरे ,कमलाकर म्हात्रे ,सुनील म्हात्रे आणि परिवार आदी उपस्थित होते .

या केंद्रा मध्ये उत्पन्नाचा दाखला ,नॉन क्रिमिलेअर ,डोमासील दाखला ,स्थानिक रहिवासी दाखला ,जातीचा दाखला ,जेष्ठ नागरिक दाखला ,संमती पत्र ,पॅन कार्ड ,जात पडताळणी अर्ज ,गुमास्ता ,फूड परवाना ,राजपत्र ,ई -सातबारा उतारा ,प्रोपर्टी कार्ड ,शेतकरी दाखला ,संजय गांधी निराधार योजना तसेच विविध प्रकारची सेवा दिली जाईल .असे . शिव सई आपले सरकार सेवा केंद्राचे संचालक स्वाती मिथुन म्हात्रे यांनी .सांगितले

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *