ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

राज्यातील पहिल्या मेडीकॅब रुग्णालयाचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते उदघाटन

July 27, 202112:41 PM 61 0 0

जालना :- जालना जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याच्या सेवा अधिक चांगल्या व दर्जेदारपणे मिळाव्यात. तसेच रेफर हॉस्पीटल म्हणुन जालन्याला लागलेला डाग पुसुन काढण्याबरोबरच जालना जिल्हा आरोग्य सुविधांच्यादृष्टीने स्वयंपुर्ण होण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्नशिल असल्याची ग्वाही राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिली. जिल्हा रुग्णालयाच्या परिसरामध्ये उभारण्यात आलेल्या 100 खाटांच्या मेडीकॅब रुग्णालयाचे उदघाटन तसेच नेत्र विभागात करण्यात आलेल्या नुतणीकरणाचे उदघाटन पालकमंत्री श्री टोपे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.


व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे,आमदार कैलास गोरंट्याल, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, डॉ. प्रताप घोडके, डॉ. पद्मजा सराफ, डॉ. संजय जगताप, कार्यकारी अभियंता श्री चांडक आदींची उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री टोपे म्हणाले, मास्टरकार्ड या कंपनीच्या अर्थसहाय्याने व अमेरीका इंडीया फाऊंडेशन यांच्या सहकार्यातुन अत्यंत सुसज्ज व सर्व सुविधांनी युक्त अशा 100 खाटांच्या मेडीकॅब हॉस्पीटलची उभारणी अवघ्या एका महिन्यात करण्यात आली आहे. मास्टरकार्ड कंपनीमार्फत संपुर्ण देशामध्ये अशाच पद्धतीच्या दोन हजार खाटांच्या रुग्णालयांची उभारणी करण्यात येणार असुन महाराष्ट्र राज्यामध्ये बारामती, अमरावती व जालना या तीन ठिकाणी प्रत्येकी 100 खाटांचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. अशा पद्धतीचे राज्यातील पहिल्या रुग्णालयाच्या शुभारंभ जालनामध्ये होत असल्याचा आनंद होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जालना जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याच्या सेवा अधिक दर्जेदार व चांगल्या पद्धतीच्या मिळण्यासाठी आरोग्यसेवेचे बळकटीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे. जालना येथे कोव्हीड रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात बेडची निर्मिती करण्याबरोबरच तालुकास्तरावरही मोठ्या प्रमाणात बेडस उपलब्ध करुन देण्यात आले. रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासु नये यादृष्टीने लिक्वीड ऑक्सिजन प्लँट, पीएसए प्लँटची उभारणी करण्यात येऊन ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये जालना जिल्हा स्वयंपुर्ण असल्याचेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.
अंबड, घनसावंगी येथील रुग्णालयामध्ये तसेच जिल्हा महिला रुग्णालयामध्ये उपलब्ध असलेल्या बेडव्यतिरिक्त अधिकच्या बेडची निर्मिती करण्यात येत असुन मंठा, भोकरदन येथे या ठिकाणी आरोग्य सुविधा बळकट करण्यावर भर देण्यात येत आहे. आजघडीला जिल्हा रुग्णालयामध्ये सर्व सोयी-सुविधा पुरविण्यात आल्या असुन सीटीस्कॅन, सी.आर सिस्टीम, एम.आर.आय, सोनोग्राफी, डायलीसीस, केमोथेरेपी व सुविधा, आरटीपीसीआर लॅब, प्लाझ्मा थेरेपी,पॅथो लॅब अद्यावतीकरण संदर्भ सेवा व रुग्णवाहिका, सर्जिकल आयसीयु यासारख्या यंत्रणा उपलब्ध करुन देण्याबरोबरच रुग्णालयात असलेली मनुष्यबळाची कमतरता भासु नये यासाठी रिक्त असलेल्या जागा प्राधान्याने भरण्यासाठीही प्रयत्न केले जात असल्याचे सांगत कोरोनाच्या संभाव्य तीसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी जालना जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम असल्याचेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.


आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले, जालना जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याच्या सेवा चांगल्या पद्धतीने मिळाव्यात यासाठी पालकमंत्री राजेश टोपे यांच्या प्रयत्नातुन अनेकविध प्रकल्प जालना जिल्ह्यात सुरु करण्यात आल्याबद्दल पालकमंत्री महोदयांचे आभार व्यक्त करत जालना जिल्ह्यात मेडीकल कॉलेजच्या उभारणीसाठीही आवश्यक ते प्रयत्न होण्याची अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी मेडीकॅब रुग्णालय उभारणी तसेच आरोग्य सुविधांबाबत सविस्तरपणे माहिती दिली.

मेडीकॅब रुग्णालय
कोवीड रुग्णालयाचे विस्तारीकरण करणे तसेच आरोग्याच्या पायाभुत सुविधा मजबूत करण्यासाठी याची उभारणी केली आहे. या रुग्णालयाचे आयुष्यमान साधारणत: 25 वर्षे असल्याने कोरोना संसर्ग संपूर्णत: आटोक्यात आल्यानंतरसुध्दा या रुग्णालयाचा विलगीकरण कक्ष किंवा कर्करोग कक्ष किंवा भविष्यात शासनाच्या इतर आरोग्य सेवा करीता उपयोग करण्याचा मानस आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात साधारणत: 30 हजार चौरस फुट जागेवर हा प्रकल्प उभारण्यात आला असून 21 हजार चौरस फुट ओटा तयार करण्यात आला आहे. यामध्ये ओटा बांधतानाच पाणी, वीज व ड्रेनेज लाईन्स टाकण्यात आल्या आहेत.
मेडीकॅब हॉस्पीटल रचना व क्षमता या हॉस्पीटलमध्ये तपासणी व निरीक्षण कक्ष, डॉक्टर कक्ष, अलगीकरण कक्ष हे चार विभाग असुन अत्याधुनिक विलगीकरण खाटा -92, अत्याधुनिक अतिदक्षता खाटा-8 अशा एकुण 100 खाटा असुन सेंट्रल ऑक्सीजन सुविधा, आय.सी.यु. मध्ये एन.आय.व्ही. सुविधा, विलगीकरणे कक्षामध्ये ऑक्सीजन कॉन्सनट्रेटर, मल्टीपॅरा मॉनिटर, ऑक्सीजन मेनिफोल्ड व ड्युरा सिलेंडर्स, जनरेटर संच, दोन पाण्याच्या टाक्या, याशिवाय आवश्यक असलेल्या इतर सुविधाही या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. यावेळी पदाधिकारी, अधिकारी तसेच नागरिकांची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *