ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरण न.पा.च्या बायो मायनिंग प्रकल्पाचे मुख्याधिकाऱ्यांनी केले उद्घाटन डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याची लागणार विल्हेवाट

January 23, 202213:40 PM 39 0 0

उरण ( संगिता पवार ) : उरण शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी उरण नगर पालिकेने बायो मायनिंग प्रकल्प सुरू केला आहे. त्याचे उद्घाटन तहसिलदार भाऊसाहेब अंधारे आणि पालिकेचे मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या हस्ते करण्यात आले. बोरी पाखाडी येथिल डम्पिंग ग्राउंडवर सुरू झालेल्या या प्रकल्पात २००७ पासून साठलेल्या कचऱ्याचीही विल्हेवाट लावण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे उरण शहरातील कचऱ्याचा प्रश्न सध्यातरी मार्गी लागला आहे.

उरण न.पा.ला डम्पिंग ग्राऊंडसाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी २००७ साली बोरी पाखाड़ी येथिल इनामदार नगर हद्दीत समुद्रालगत एक हेक्टर क्षेत्राचा भूखंड दिला होता. त्या जागेत उरण शहरातील कचरा टाकला जात होता. मात्र या भूखंडा लगत असणाऱ्या हनुमान कोळीवाडा या गावाला कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रास होऊ लागल्याने व सदर भूखंड या गावाच्या पुनर्वसन येत असल्याने त्या ग्रामस्थांनी सदर डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने सदर डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावून हा भूखंड वनखात्याकडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आहेत. नगर पालिकेने या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू केले असून हे काम भाग्यदीप वेस्ट मॅनेजमेंट प्रा लि या कंपनीला दिले आहे. त्यासाठी सुमारे १० लाख ४५ हजारांचा खर्च होणार आहे. सुमारे ३ महिन्यात हे काम संपवून कचऱ्यापासून माती व खत निर्माण होणार आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावून सदर भूखंड वनखात्याकडे वर्ग करण्यात येईल असे मुख्याधिकारी संतोष माळी यांनी सांगितले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *