ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

बुटेगाव, नानेगाव आणि बाजार वाहेगावमध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन

October 25, 202113:52 PM 8 0 0

बदनापूर, दि. २४(सा.वा.)-बदनापूर तालुक्यातील रोषणगाव-वाकुळणी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या तसेच जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अयोध्याताई चव्हाण यांनी आपल्या गटातील विविध गावांतील विकास कामांचा सुरूच ठेवला असून नानेगाव ते कुसळी हा रस्ता, नानेगाव येथील नवीन अंगणवाडी इमारत, बाजार वाहेगाव ते कुसळी हा रस्ता व बाजारवाहेगाव येथे हायमास्ट पथदिव्यांचे उदघाटन आज शिवसेना तालुकाप्रमुख जयप्रकाश चव्हाण यांच्या हस्ते गावकNयांच्या उपस्थितीत करण्यात आले.

रोषणगाव – वाकुळणी जिल्हा परिष्द गटातील नानेगाव ते कुसळी हा रस्ता मंजूर करून त्यासाठी निधी उपलब्ध करण्यात आल्याबाबत ग्रामस्थांच्या वतीने अयोध्याताई व जयप्रकाश चव्हाण यांचे यावेळी विशेष आभार व्यक्त करण्यात आले. या रस्त्याबरोबरच चव्हाण दांपत्याच्या प्रयत्नाने नानेगाव येथील अंगणवाडी इमारत, बाजार वाहेगाव ते कुसळी हा रस्ता व बाजार वाहेगाव येथे हायमास्ट पथदिव्यासाठी विशेष निधी उपलब्ध झाल्यामुळे हे सर्व कामे वेळेत पूर्ण झाली असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. नानेगाव येथे केलेल्या या विकास कामांबाबत सरपंच संभाजी सोनवणे व उपसरपंच अमोल चव्हाण व सदस्यांच्या वतीने जयप्रकाश चव्हाण यांचा सत्कारही करण्यात आला. या उद्घाटन प्रसंगी पंचायत समितीचे उपसभापती रवीकुमार बोचरे, हरिभाऊ कापसे, शाखा अभियंत राऊत, नानेगावचे सरपंच संभाजी सोनवणे, उपसरपंच अमोल चव्हाण, प्रसाद चव्हाण, गणेश चव्हाण, सुदाम काळे, गणेश काळे,सरपंच बाबू आर्सूड, सुनील चव्हाण, बाबूराव सोनवणे, अरूण काळे, राजेश चव्हाण, योगेश चव्हाण, परमेश्वर चव्हाण, सतिश चव्हाण, संजय चव्हाण, शामराव चव्हाण, रमेश काळे, उध्दव दिक्षीत, कल्याण काळे, रामेश्वर काळे, बाबूभाई सय्यद, जिजा काळे, शिवाजी काळे, दत्ता गवारे, भाऊसाहेब वैद्य, ज्ञानेश्वर पवार यांच्यासह विविध गावातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *