ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जिल्ह्यात आरटीपीसीआर तपासण्याची संख्या अधिक प्रमाणात वाढवा : पालकमंत्री राजेश टोपे

May 5, 202113:03 PM 113 0 0

जालना  :- जिल्ह्यात कोरोनाबधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. ही अतिशय चिंतेची बाब असून अँटिजेंन तपासण्याच्या तुलनेत आरटीपीसीआर चाचण्याची संख्या अधिक प्रमाणात वाढविण्याबरोबरच संस्थात्मक अलगिकरणावर अधिक भर देण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कोरोनाच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री. टोपे बोलत होते.

यावेळी यावेळी जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधिक्षक विनायक देशमुख,अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे,उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र परळीकर, उपजिल्हाधिकारी सामान्य शर्मिला भोसले, उपजिल्हाधिकारी गणेश नि-हाळी, जिल्हा पुरवठा अधिकारी रिना बसैय्ये, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, उपविभागीय अधिकारी संदीपान सानप,उपविभागीय अधिकारी शशीकांत हदगल, उपजिल्हाधिकारी अंजली कानडे, जिल्हा शल्यचित्किसक डॉ.अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगांवकर,नगर परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी नार्वेकर, डॉ. संतोष कडले, डॉ.संजय जगताप आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री श्री टोपे म्हणाले, कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्ती उशिराने रुग्णालयात भरती होत असल्याने त्यांना वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्णांची प्रकृती खालावत असुन रुग्णांचा मृत्यूही होत आहे. ही अतिशय चिंतेची बाब आहे. सर्वसामान्य नागरिक सर्दी, ताप, खोकला यासारखी कोरोनाची लक्षणे असतानाही याकडे दुर्लक्ष करत असून घरीच राहत आहेत. त्यामुळे बाधित रुग्णांचे संस्थात्मक अलगिकरणावर भर देण्यात यावा. तसेच कोरोनामुळे रुग्णांचा मृत्यू होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिले.

खासगी दवाखान्यात कोविड बाधितांवर उपचारापोटी आकारण्यात येणाऱ्या दरांमध्ये नगर परिषद व नगरपंचायतनिहाय सुधारणा करण्यात येणार असल्याचे सांगत जे खासगी दवाखाने शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिकचे दर आकारातील अशा रुग्णालयावर कारवाई करून वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रसिद्धी करण्यात यावी. तसेच खासगी रुग्णालयात आवश्यकता नसतानाही रुग्णांना वेगवेगळ्या तपासण्या करण्यास सांगण्यात येतात. त्यामुळे रुग्णांवर अधिकचा आर्थिक भार पडतो. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व खासगी दवाखान्यातील डॉक्टरांची बैठक घेऊन त्यांना सूचना करण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिले.

जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, कोविड केअर सेंटर येथे रुग्णांना अधिक चांगल्या प्रमाणात आरोग्य सेवा मिळाव्यात तसेच उपलब्ध मनुष्यबळावर अधिक प्रमाणात ताण येऊ नये यासाठी डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, शिपाई, स्वच्छता सेवक यांच्या भरतीची तातडीने जाहिरात देऊन पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे. या कामास प्रथम प्राधान्य देऊन हे काम कमी वेळेत जलदगतीने पूर्ण करण्यात यावे. जिल्ह्यातील प्रत्येक कोविड सेन्टरवर चोवीस तास डॉक्टर्स, नर्स उपलब्ध राहतील तसेच याठिकाणी ठेवण्यात आलेल्या रुग्णांना पौष्टीक व चांगल्या दर्जाचे जेवण उपलब्ध करून देण्याबरोबरच या ठिकाणी स्वच्छता राहील, याचीही खबरदारी घेण्याच्या सूचना पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिल्या.

कोरोनाबधित गंभीर रुग्णांवर उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या रेमेडिसेंविर इंजेक्शनची मागणी वाढल्याने या इंजेक्शन्सचा काळाबाजार होणार नाही याची दक्षता घेण्याबरोबरच रुग्णालयात असलेल्या बेडच्या संख्येनुसार समान पद्धतीने इंजेक्शन्सचा पुरवठा करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

दिवसेंदिवस कोरोनाबधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने ऑक्सिजनची मागणीही त्याप्रमानात वाढली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक खासगी रुग्णालयांच्या मागणीनुसार ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात यावा. तसेच प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन जनरेटर प्लॅन्ट उभारण्यात येत असून हे काम अधिक जलदगतीने करण्यात यावे. तसेच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या प्रत्येकाची नगरपालिकेने तंतोतंत नोंद ठेवण्याच्या सूचनाही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिल्या.

ग्रामीण भागामध्ये खासगी डॉक्टरांनी कोविडची लक्षणे असलेल्यांचीच चाचणी करावी व शासनाने दिलेल्या सुचनाप्रमाणेच रुग्णांवर आवश्यक ते उपचार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

ब्रेक द चेन अंतर्गत राज्य शासनाने 1 मे पर्यंत संपूर्ण राज्यात कडक निर्बंध लावले आहेत. काम नसतानाही विनाकारण अनेकजन बाहेर फिरत आहेत. जिल्ह्यात वाढत चाललेली कोरोना बधितांची संख्या कमी होण्यासाठी कोरोना विषाणूची साखळी तोडणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यात निर्बंधाची पोलीस प्रशासनाने कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या.

टाटा सन्स यांच्याकडून जिल्ह्यासाठी मास्क, पीपीई किट, व्हेंटिलेटर प्राप्त झाले असून त्याचे समान पद्धतीने वाटप करण्यात यावे. तसेच सर्व रुग्णालयाचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट करून त्याचा अहवाल तातडीने सादर करण्याचा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

कोरोनापासुन बचाव होण्यासाठी लसीकरण मोहिमेला अधिक गती देण्याची गरज असल्याचे सांगत 1 मे पासून 18 वर्षावरील प्रत्येकाला लस देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. लसीची उपलब्धता कमी असल्यामुळे जालना जिल्ह्यात पाच ठिकाणी या वयोगटातील व्यक्तींना लस देण्यासाठी केंद्र सुरू करण्यात आले असून ज्या प्रमाणात लस उपलब्ध होईल त्याप्रमाणे केंद्रात वाढ करत लसीकरण पूर्ण करण्याच्यादृष्टीने सुक्ष्म व काटेकोर असे नियोजन करण्याच्या सूचनाही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिल्या.

बैठकीस संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *