ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

शिक्षकांवरील कारवाई विरोधात पालक- शिक्षकांचे जेएनपीटी शाळेविरोधात बेमुदत आंदोलन सुरुच; दोन्ही माध्यमांतील शाळा बंद आंदोलन चिघळण्याचीच शक्यता

December 23, 202113:44 PM 36 0 0

उरण ( संगिता पवार ) : जेएनपीटी अंतर्गत असलेल्या रुस्तमजी केरावाला फाऊंडेशन (आरकेएफ) शाळेतील सात शिक्षकांवरील कारवाईनंतर सोमवारपासून शाळेच्या व्यवस्थापनाविरोधात पालक- शिक्षकांचे बेमुदत आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे.पालक-विद्यार्थीही आंदोलनात सहभागी झाल्याने जेएनपीटीतील आरकेएफच्या दोन्ही माध्यमांतील शाळा बंद पडल्या आहेत.या आंदोलनाला अनेक सामाजिक संघटनांनीही पाठिंबा दिला आहे.यामुळे आंदोलन चिघळण्याचीच अधिक शक्यता निर्माण झाली आहे.

जेएनपीटीची कामगार वसाहतीमध्ये केजी ते १० पर्यंत इंग्रजी, मराठी माध्यमाची शाळा आहे.या शाळेत २७०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याआधी मागील २० वर्षांपासून सलग जेएनपीटीने इंडियन एज्युकेशन सोसायटी – मुंबई या संस्थेला शाळा करारावर चालविण्यास दिली होती. जेएनपीटी वर्षाकाठी सुमारे चार कोटी रुपये खर्च करीत होती. मात्र वाढता शैक्षणिक खर्च कमी करण्यासाठी दोन वर्षापुर्वी काढण्यात आलेल्या निविदानंतर एक कोटी ९० लाख इतक्या वार्षिक खर्चावर तयार झालेल्या मालाड- मुंबई येथील रुस्तमजी केरावाला फाऊंडेशनला ही शाळा १ जुलै २०१९ पासून चालविण्यासाठी देण्यात आली आहे.या शाळेत मागील ३० वर्षांपासून १०६ शिक्षक काम करीत आहेत.मात्र आरकेएफ शाळा व्यवस्थापनाने शिक्षकांच्या विरोधातच नियमांना बगल देत अन्यायी धोरण राबविण्यास सुरुवात केली आहे.वेतन कपात तसेच सहा शिक्षकांवर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.दोन दिवसांपूर्वी १ ते ४ थी पर्यंतची शाळा जुन्या इमारतीमध्ये भरविण्याऐवजी दुसऱ्याच इमारतीत भरविण्याचा प्रयत्न शिक्षक -पालकांनी एकत्रित येऊन
हाणून पाडला.यामुळे संतप्त झालेल्या शाळा व्यवस्थापनाने कारवाई करत शाळेचे मुख्याध्यापक व संघटनेचे कार्याध्यक्ष रमाकांत गावंड यांच्यावर सक्तीच्या रजेवर पाठविण्याची कारवाई केली आहे.या कारवाईनंतर पालक- शिक्षकांनी जेएनपीटी शाळेविरोधात बेमुदत आंदोलनाला सुरुवात केली आहे.कोणताही तोडगा निघाला नाही.अथवा व्यवस्थापनाने आंदोलनकर्त्यांकडे पाठ फिरवली आहे.त्यामुळे पालक शिक्षकांचे आंदोलन सुरूच आहे.त्यामुळे मात्र दोन्ही माध्यमांतील शाळा बंद पडल्या आहेत.दरम्यान आंदोलनाला विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्षांच्या पुढारी, नेत्यांनी पाठिंबा दिला आहे.यामुळे आंदोलन चिघळण्याचीच अधिक शक्यता निर्माण झाली आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *