ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

विविध मागण्यासाठी शिक्षक व पालकांचे बेमुदत धरणे आंदोलन

December 22, 202113:46 PM 45 0 0

उरण  (संगीता ढेरे ) : आर के एफ या संस्थेने मुख्याध्यापक रमाकांत गावंड यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याबाबतचे नियमबाह्य पत्र देऊन शासकीय नियमांचा भंग केल्यामुळे त्याचा निषेध करण्यासाठी तसेच सदर नोटीस त्वरित मागे घ्यावी आणि शासन निर्णया प्रमाणे बंधनकारक असणाऱ्या इतर मागण्या मान्य करण्यासाठी शाळेच्या गेटवर कोविड 19 च्या नियमांचे पालन करून सर्व पालक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी संविधानिक मार्गाचे अवलंब करून बेमुदत धरणे आंदोलनाला सुरवात केली असून दि 21/12/2021रोजी बेमुदत धरणे आंदोलनाचा दुसरा दिवस आहे.

जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालयाची स्थापना सण 1989 साली झाली असून त्याचे व्यवस्थापन इंडियन एज्युकेशन सोसायटी मुंबई यांच्या मार्फत गेली 30 वर्षे होत होते.1 जुलै 2019 पासून जे एन पी टी मॅनेजमेंटने हे विद्यालय चाळविण्यासाठी रुस्तोमजी केरावाला फॉउंडेशन, मालाड मुंबई या संस्थेस दिलेले आहे. तेव्हापासून आजतागायत हि संस्था अनधिकृतपणे शाळा चालवत आहे. या संस्थेस हि शाळा चाळविण्यासाठी शासनाची कोणत्याही प्रकारची मान्यता नाही. या संस्थेने महाराष्ट्र शासन निर्णय दिनांक 17/2/2012 नुसार हस्तांतरण केलेले नाही त्यामुळे हि शाळा चालवीण्याचा त्यांना कोणताही अधिकार नसताना दिनांक 18/12/2021 रोजी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक रमाकांत गावंड यांना कोणतेही सबळ कारण नसताना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. तसेच विनाकारण 6 शिक्षकांना देखील निलंबित करण्यात आले आहे.त्यांना अडीच वर्षाचा पगार देखील देण्यात आलेले नाही. एकूण 114 शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर अशी बेकायदेशीर अनधिकृत कारवाईची टांगती तलवार आहे.या घटनेमुळे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी पालक वर्गात असंतोष निर्माण झाला आहे. या कृत्याचा निषेध करण्यासाठी व विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक वर्ग दिनांक 20/12/2021 पासून शाळेच्या गेट समोरच बेमुदत आंदोलनाला बसले आहेत.कोकण विभाग अध्यक्ष नरसु पाटील, शिक्षक सेना महाराष्ट्र राज्याचे, जिल्ह्याचे पदाधिकारी, न्हावा शेवा अंतर्गत बंदर कामगार संघटना, उरण सामाजिक संस्था, छावा संघटना उरण, उरण एकजूट संघटना, माजी विद्यार्थी संघटना तसेच सर्व राजकीय पक्षांनी या आंदोलनाला जाहिर पाठिंबा दिला आहे.सदर समस्यांचे निवेदन पत्रव्यवहाराद्वारे शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आदितीताई तटकरे, रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, अतिरिक्त मुख्य सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग -वंदना कृष्णा मॅडम, चेअरमन- जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट,आमदार बाळाराम पाटील, आमदार महेश बालदी, आर के एफ संस्थेचे उपाध्यक्ष कविता केरावाला, शिक्षणाधिकारी रायगड जिल्हा, गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती उरण,नवी मुंबई पोलीस आयुक्तालय, न्हावा शेवा पोलीस स्टेशन आदी शासकीय विभागांना देण्यात आले आहे.सदर धरणे आंदोलन पालक शिक्षक संघर्ष समितीचे अध्यक्ष विकास कडू, पालक संघर्ष समितीचे अध्यक्ष किरण घरत, मुख्याध्यापक रमाकांत गावंड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे
1)प्रकल्पग्रस्त व स्थानिक पाल्यांची गेली अडीच वर्षे जी प्रवेश प्रक्रिया या प्रशासनाने हेतूपरस्पर विनाकारण थांबवून धरलेली आहे. ती ताबडतोब के जी विभागापासून सुरु करणे व इतर सर्व वर्गांचे प्रवेश खुले करणे.
2)शालेय विद्यार्थ्यांना मागील दोन वर्षाची प्रगती पुस्तके विनाविलंब देणे
3)शालेय विद्यार्थ्यांना फि कार्ड देणे, विद्यार्थ्यांना शालेय गणवेश नियमित करणे, विद्यार्थ्यांना शालेय ओळखपत्र तातडीने देणे
4)प्रकल्पग्रस्त पाल्यांना फी माफीच्या उत्पन्नाची मर्यादा एक लाख रुपयावरून आठ लाख रुपये करण्यात यावी
5)प्रकल्पग्रस्त पालकांच्या मागणीनुसार विद्यार्थ्यांचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड दाखला शाळा चालवीणाऱ्या संस्थेचा नावाचा देण्यात यावा.
6)जिथे प्राथमिक विभाग इंग्रजी माध्यमाची शाळा आहे त्याच इमारती मध्ये म्हणजेच सेक्टर 1 मधील के जी विभागाच्या मागच्या बाजूलाच भरविण्यात यावी.
7)मुख्याध्यापक रमाकांत गावंड यांच्या सक्तीचे रजेचे पत्र बिनशर्त विनाअट मागे घेणे
8)सहा कर्मचाऱ्यांचे यापूर्वी केलेले निलंबन बिनशर्त विनाअट मागे घेणे. त्यांना शासकीय नियमानुसार देय असलेला पगार जुलै 2019 पासून देण्यात यावा.
9)सर्व शालेय कर्मचाऱ्यांना जुलै 2019 पासून शासकीय नियमानुसार देय असलेला पगार विना विलंब देण्यात यावा.
10)सर्व शालेय कर्मचाऱ्यांना जुलै 2019 पासून थकीत ठेवण्यात आलेला पी एफ, ग्रज्यूइटी व इतर देणी विना विलंब तातडीने भरणा करावी
11)कॉन्ट्रॅक बेसवर काम करणाऱ्या सर्व शालेय शिक्षक आणि शालेय कर्मचाऱ्यांना कायम करून नियमानुसार पगार देणे.
12)17/2/2012 च्या शासन निर्णया नुसार दोन्ही संस्था मधील हस्तांतरण लवकरात लवकर करण्यात यावे.
13)सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना शासकीय नियमानुसार निवृत्ती नंतरचे देय असलेले सर्व लाभ त्वरित देण्यात यावे.
14)जे एन पी टी. व आय ई एस प्रशासनाकडून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल 2019 ते जून 2019 या तीन महिन्याचे थकीत वेतन देण्यात यावे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *