मुरूड जंजिरा ( सौ नैनिता कर्णिक) मुरूड जंजिरा नगरपालिकांच्या शाळांतून या वर्षी भारताचा यंदाचा ७५ वा अमृत महोत्सवी वर्ष असताना देखील कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी साधेपणाने साजरा करण्यात आला. केंद्रप्रमुख तथा नगरपालिका मुरुड जंजिरा शाळा नं २ च्या मुख्याध्यापिका श्रीमती अनघा चौलकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या ध्वजारोहणासाठी शाळा नं २ मधील सहशिक्षिका सौ सायली गुंजाळ सौ मंगला मुनेकर अंगणवाडी शिक्षिका सौ सोनाली इतरकर(पैर) सौ घराणे मॅडम तसेच माजी मुख्याध्यापिका व्यवस्थापन समिती सदस्या तथा पत्रकार सौ नैनिता कर्णिक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सौ मंगला मुनेकर मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
Leave a Reply