ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

इंडियन नेव्हीला मिळाला नवीन ध्वज; गुलामगिरीच्या प्रतिकापासून मुक्ती

September 5, 202213:15 PM 8 0 0

भारतीय नौदलाला आता नवीन ध्वज मिळाला असून वसाहतवादाचा भूतकाळ या ध्वजामुळे दूर होणार असून यामुळे आता भारताचा समृद्ध सागरी वारसा जगासमोर दिसणार आहे. आता सर्व युद्धनौका, ग्राउंड स्टेशन आणि नौदल एअरबेसवर नौदलाचा ध्वज फडकताना दिसणार आहे.

नवी दिल्ली लाल किल्ल्यावरून 15 ऑगस्ट 2022 रोजी देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, आपल्याला गुलामगिरीच्या मानसिकतेतून शतप्रतिशत मुक्तीचा संकल्प घेऊन पुढे जायचे आहे. आज प्रत्येक क्षेत्रात भारत हा जगातील महासत्ता असणाऱ्या देशांच्या बरोबरीने पुढे पुढे जात आहे. आजपर्यंत भारतीय नौदलाच्या  ध्वजावर गुलामगिरीचे प्रतीक दिसत होते, तो ध्वज आता काढला जाऊन..

नुकतेच 2 सप्टेंबर 2022 रोजी शिपयार्ड लिमिटेड निर्मित भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका INS विक्रांतचं उद्घाटन झाले आहे. कोची येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  भारतीय नौदलाच्या नवीन नौदल चिन्हाचं (ध्वज) अनावरणही करण्यात आले. नौदलाचा नवीन झेंडा नेमका कसा राहिलं? याची उत्सुकता सर्वत्रच होती.

या नव्या ध्वजाच्या अष्टकोनी बोधचिन्हाच्या खाली देवनागरीत ‘शाम नो वरुण:’ असे नाव कोरलेले आहे. याचा अर्थच असा आहे की, पाण्याची देवता वरुण आपल्यासाठी शुभ असू देत. भारतीय सनातन परंपरेत वरुणाला पाण्याची देवता मानले जाते असाही त्याचा अर्थ सांगितला गेला आहे.

भारतीय नौदलाच्या ध्वजामध्ये झालेला हा बदलाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, आपल्याला गुलामगिरीचे प्रतीक हटवायचे आहे. आतापर्यंत चालत आलेला ध्वज पाहिला तर त्यामध्ये असलेला क्रॉस हा ब्रिटनच्या राष्ट्रीय ध्वजाशी साम्य आहे. त्यामुळे पांढऱ्या रंगावरील लाल क्रॉस सेंट जॉर्ज क्रॉस म्हणून ओळखला जाते. सेंट जॉर्ज क्रॉसचे नाव एका ख्रिश्चन संताच्या नावावर ठेवण्यात आले असून तो तिसऱ्या धर्मयुद्धाचा योद्धा असल्याचेही सांगितले जात आहे. इंग्लंडच्या राष्ट्रीय ध्वजावरही त्याच सेंट जॉर्ज क्रॉसचे चिन्ह असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन

नौदलाच्या नवीन ध्वजामध्ये वरच्या कोपऱ्यावर भारताचा तिरंगा आहे. तर दुसर्‍या अर्ध्या भागामध्ये नौदलाची शिखा आहे. हे निळे चिन्ह अष्टकोनाच्या आकारात असून जे भारतीय नौदलाच्या चारही दिशा आणि चार कोन म्हणजे आठ दिशा दाखवते.

अष्टकोनी चिन्हाच्या काठावर दोन सोनेरी किनारी असलेले अष्टकोनी चिन्ह देशाचे महान मराठा योद्धा, छत्रपती शिवाजी यांच्या युद्धनीती शास्रातील ढालीने प्रेरित असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दूरदृष्टीकोनातूनच नौदलाची स्थापना करण्यात आली आहे. 60 लढाऊ जहाजे आणि 5000 सैन्यांसह त्यांनी सागरी मार्गाने घुसखोरी करणाऱ्या बाह्य सैन्याला आव्हान दिले असल्याचा इतिहासही नौदलासमोर असल्याचे सांगण्यात आले आहे.

भारतीय नौदलाचा आधीचा झेंडा पांढऱ्या रंगाचा असून त्यावर उभ्या आणि आडव्या दोन लाल रंगाच्या रेषा होत्या, ज्याला आपण सेंट जॉर्ज क्रॉस चिन्ह म्हणतो. या झेंड्याच्या वरच्या बाजूला डाव्या कोपऱ्यात तिरंगा होता. नौदलाचा हा झेंडा आता बदलला आहे.कोची येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन झेंड्याचं अनावरण करण्यात आले आहे.

भारतीय नौदलाचा झेंडा बदलण्याची ही पहिलीच वेळ नसून?

एकूण चार वेळेस ध्वज बदलण्यात आले आहे.

मागील अनेक वर्षांपासून झेंड्यात बदल करण्याची मागणी केली जात होती. व्हाईस अॅडमिरल व्हीईसी बारबोझा यांनी सर्वप्रथम ही मागणी केली होती.

 

सौ.रूचिरा बेटकर नांदेड

9970774211

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *