ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

भारतीय संख्याशास्त्रज्ञ : डॉ. राधा गोविंद लाहा

September 29, 202115:21 PM 8 0 0

समाजजीवनाशी संबंधित असणाऱ्या संख्याशास्त्र म्हणजेच आकडेवारीच्या किचकट विषया मधील संभाव्यता वितरणाची गुणवर्णने या विषयावरील संशोधनाकरिता प्रसिद्ध असलेले विद्यार्थीप्रिय संख्याशास्त्रज्ञ डॉ. राधा गोविंद लाहा यांचा १ ऑक्टोबर हा जन्मदिन. संभाव्यता व संख्याशास्त्र या विषयावरील अनेक क्रमिक पुस्तके लिहीणारे, अनेक शोधनिबंधांचे लेखक तसेच फ्रेंच,रशियन,बंगाली,हिंदी आदी भाषेतील शोधनिबंधांचे मूल्यमापन तसेच त्यांचा इतर भाषेत अनुवाद करणारे डॉ. राधा गोविंद लाहा यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा थोडक्यात परिचय करून देण्याचा हा प्रयत्न ……
संख्याशास्त्रज्ञ डॉ. राधा गोविंद साहा यांचा जन्म १ ऑक्टोंबर १९२६ रोजी कोलकाता येथे झाला. ते ख्यातनाम संख्याशास्त्रज्ञ प्रोफेसर सी. आर. राव यांचे विद्यार्थी. डॉ. साहा यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण कोलकात्यामध्येच झाले. शालेय जीवनात त्यांनी अनेक पारितोषिके आणि शिष्यवृत्त्या मिळविल्या. यामध्ये प्रामुख्याने सरदप्रसाद प्राईझ,डफ्फ शिष्यवृत्ती, एस.एस. बोस सुवर्णपदक आणि कोलकाता विद्यापीठाचे रौप्य पदक यांचा समावेश करावा लागेल. १९४९ मध्ये त्यांनी प्रेसिडेन्सी कॉलेजमधून प्रथम क्रमांकाने संख्याशास्त्रा मधील पदवी प्राप्त केली तर १९५१ मध्ये प्रथम श्रेणी मध्ये पदव्युत्तर पदवी मिळविली. कोलकत्ता विद्यापीठांमधून १९५७ मध्ये त्यांनी पी.एच.डी. ही पदवी प्राप्त केली. त्यांच्या संशोधनाचा विषय होता, ‘विश्लेषणात्मक संभाव्यता उपपती’ (एनालिटिकल प्रोबॅबिलिटी थेअरी).
दरम्यान, १९५२ मध्ये ते कोलकाता येथील इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट (आय.एस.आय.) या संस्थेमधील संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र (रिसर्च अँड ट्रेनिंग स्कूल) या विभागांमध्ये रुजू झाले. याच वेळी फ्रान्स,अमेरिका, स्वित्झर्लंड आदी देशातील सांख्यिकीय संस्थांनी त्यांना निमंत्रित केले. अल्पावधीतच म्हणजे १९६० पर्यंत त्यांनी आपल्या संशोधन कार्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळविली. १९५८ मध्ये ते संशोधन सहकारी (रिसर्च असोसिएट) म्हणून कॅथलिक युनिवर्सिटी ऑफ अमेरिका वॉशिंग्टन डी.सी. येथे कार्यरत झाले. त्यानंतर दोन वर्षासाठी ते भारतात आय.एस.आय. मध्ये परतले आणि पुन्हा १९६२ मध्ये कॅथॉलिक युनिव्हर्सिटी मध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. येथे ते १९७२ पर्यंत कार्यरत राहिले. त्यानंतर ते औहिओ येथील बॉउलिंग ग्रीन स्टेट युनिव्हर्सिटी मध्ये कॅथॉलिक युनिवर्सिटी मधील त्यांचे सहकारी विजय रोहटगी आणि एयूगेने ल्युकास यांच्या समवेत रवाना झाले. तेथूनच ते १९९६ साली निवृत्त झाले.


संशोधन आणि लेखन कार्य
‘संभाव्यता वितरणाचे गुणवर्णन’ (कॅरेक्टरायझेशन ऑफ प्रोबाबिलीटी डिस्ट्रीब्यूशन) हा डॉ. लाहा यांच्या आवडीचा संशोधनाचा विषय. त्यांचा सर्वात गाजलेला एक निष्कर्ष म्हणजे, दोन स्वतंत्र आणि भिन्न (इंडीपेनडंट एंड नॉनआयडेंटीकल) वितरण असणाऱ्या सादृच्छिक चलांचे गुणोत्तर हे कॉशी वितरणा प्रमाणे असते; जर आणि फक्त ती चले सामान्य वितरण अनुकरण करत असतील तर. लाहा यांनी ह्या सिद्धांताला प्रसिद्ध केले आणि त्यांनी या सामान्य (नॉर्मल) नमुना वितरणाच्या गुणधर्माचे अनेक प्रकारे सामान्यीकरण केले. यासाठी त्यांनी नमुना सरासरी (सैम्पल मीन) आणि नमुना विचरण (सैम्पल व्हेरीयन्स) यांच्या स्वतंत्रते चा आधार घेतला.
डॉ. लाहा यांनी सांख्यिकी आणि संभाव्यता सिद्धांतावर अनेक क्रमिक पुस्तके लिहिली असून त्यांचे अनेक संशोधन लेखही विविध नियतकालिकांतून प्रकाशित झाले आहेत. तसेच त्यांनी फ्रेंच, रशियन,बंगाली,हिंदी,इंग्रजी आदी भाषेतील शोधनिबंधांचे मूल्यमापन(रिव्ह्यू) केले असून इतर भाषांत अनुवादही केला आहे. इंस्टीट्युट ऑफ मैथेमेटीकल सोसायटी चे फेलो,आणि इंटरनैशनल स्टॅटिस्टिकल सोसायटी चे सभासद असणारे डॉ. लाहा हाडाचे शिक्षक होते. कोणतीही गोष्ट नीटपणे समजावून सांगण्या मध्ये त्यांचा हातखंडा असल्याने ते त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये आदरणीय आणि प्रिय होते. विज्ञाना खेरीज डॉ. लाहा यांना संगीत आणि नाटकाची विशेष आवड होती. या क्षेत्रातील त्यांचे सखोल वाचन होते. नाटकांविषयी च्या आणि संगीत रचनाकारा बाबतच्या चर्चांमध्ये उत्साहाने भाग घेणारे लाहा जेव्हा लंडन, पैरीस, न्युयॉर्कला जात तेव्हा नाटकांना आणि संगीत कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहत असत. डॉ. लाहा यांचे पेरीसबर्ग, औहिओ येथे १४ जुलै १९९९ रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या स्मृतिस विनम्र अभिवादन ! (संदर्भ :भारतीय संख्याशास्त्रज्ञ -डॉ. मधुसूदन डिंगनकर).
आपला विश्वासू
प्रा. विजय कोष्टी,
कवठे महांकाळ (सांगली)
९४२३८२९११७

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *