ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

केंद्रीय नौकानय मंत्री सरबानंद सोनोवाल यांच्यासोबत भारतीय पोर्ट अँड डॉक महासंघाची नवी दिल्ली येथे बैठक

August 27, 202217:54 PM 18 0 0

उरण (संगीता ढेरे ) : देशाचे केंद्रीय नौकानयन मंत्री सरबानंद सोनोवाल यांची भारतीय पोर्ट अँड डॉक महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री व वेतन करार समितीचे सदस्य व कामगार नेते सुरेश पाटील यांनी नवी दिल्ली येथील ट्रान्सपोर्ट भवन मध्ये भेट घेऊन देशातील प्रमुख बंदरातील कामगारांच्या विविध प्रश्नावर चर्चा घडवून आणली. यामध्ये वेतन करार लवकरात लवकर करावा व इतर महत्त्वाच्या मागण्यांचे निवेदन मा.केंदिय नौकानयन मंत्री सरबानंद सोनोवाल यांना दिले.

तसेच वेतन करार समितीमध्ये सर्व महासंघांना समान संधी द्यावी आणि वेतन करारातील जाचक अटी मागे घ्याव्यात अशी मागणी केली .आणि विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे मुंबई पोर्ट येथे भारतीय मजदूर संघास कार्यालय मिळावे अशी मागणी जोरदारपणे माननीय मंत्री महोदयांकडे केली त्यावर मंत्री महोदयांनी ही मागणी लगेच मंजूर करून भारतीय मजदूर संघास मुंबई पोर्ट मध्ये कार्यालय देण्याचे मान्य केले.

या चर्चेमध्ये केंद्रीय नौकानय मंत्री सरबानंद सोनोवाल तसेच नौकानयन चीफ सेक्रेटरी राजीव नयन व नौकानयन मंत्रालयातील इतर अधिकारी उपस्थित होते तसेच भारतीय पोर्ट अँड डॉक महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री व वेतन करार समितीचे सदस्य कामगार नेते सुरेश पाटील, विशाखापट्टणचे बी. एम. एस.चे कामगार नेते गोपी पटनायक, पॅरादीप पोर्ट बी. एम. एस.चे कामगार नेते श्रीकांत राय व इतर नेते उपस्थित होते.या बैठकीत मंत्री महोदयांनी भारतीय मजूर संघाच्या कामगार नेत्यांना सकारात्मक प्रतिसाद देऊन कामगारांचे प्रश्न समजून घेतले व या प्रश्नांची लवकरात लवकर सोडवणूक करण्याचे आश्वासन दिले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *