ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

भारतीय मजदूर संघ रायगड जिल्ह्याची तहसीलदार कार्यालय समोर महागाई विरोधात निदर्शने

May 10, 202212:57 PM 29 0 0

उरण (संगिता पवार ) : सोमवार (दि 9 )मे 2022 रोजी भारतीय मजदूर संघ रायगड जिल्ह्याच्या वतीने तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी श्री. भाऊसाहेब अंधारे यांना महागाईच्या भस्मासुराला विरोधात निवेदन देण्यात आले. सदर निवेदन हे प्रचंड वाढलेल्या महागाईला अनुसरून देण्यात आले, सध्याचे पेट्रोल डिझेलचे भाव बघता महागाईने आसमान कवेत घेतले आहे. तसेच किरकोळ बाजारात व किराणा दुकानात किमती या साधारण दुपटीने वाढल्या आहेत.
याचा परिणाम माणसांच्या कामगारांच्या गरिबांच्या खिशावर मोठ्या प्रमाणात होत आहे. सदरची बाब गंभीर असून, या राज्यांमध्ये या देशांमध्ये विरोधी पक्ष हा कमजोर असल्याने या सरकारला जाब विचारणारे कोणी नाही.
त्यासाठीच भारतीय मजदूर संघ रस्त्यावरती उतरला आहे प्रचंड वाढलेली महागाई कमी करण्यासाठी आगामी काळात राज्य सरकारने सर्व कर कमी करून गोरगरीब कष्टकरी जनतेला दिलासा द्यावा. यासाठी तहसीलदार यांच्यामार्फत एक पत्र महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार श्री उद्धवजी ठाकरे यांच्या नावाने आज कार्यकर्त्यांनी आक्रोश स्वरूपात दिलेले आहे.
जर या पत्रावर ती उचित विचार केला नाही तर भारतीय मजदूर संघाच्या रोषाला सामोरे जावे लागेल. असा इशारा रायगड जिल्ह्याचे भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुरेश पाटील तसेच उपाध्यक्ष .मधुकर पाटील, अॅड. विशाल मोहिते सचिव महाराष्ट्र प्रदेश, धर्माजी पाटील मंगेश पवार याबाबत या बरोबर कार्यकर्ते उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *