ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

भारतातील पहिल्या जेएनपीटी-सेझ मुळे बंदर आधारित औद्योगिकीकरणास मिळाली गति

July 24, 202117:25 PM 86 0 0

उरण(संगिता पवार) मुंबई, 19 जुलै, 2021 : जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट अर्थात जेएनपीटी हे भारतातील एक प्रमुख कंटेनर पोर्ट आहे. जेएनपीटी ने आपल्या विशेष आर्थिक क्षेत्रातील (सेझ) 9 यशस्वी निविदाकारांना आशय पत्र हस्तांतरीत करून एसईझेडच्या विकासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. जेएनपीटीचे उपाध्यक्ष श्री उन्मेष शरद वाघ, भा.रा.से. यांनी यशस्वी निविदाकारांना आशय पत्रे हस्तांतरीत केली, यावेळी जेएनपीटीचे सर्व विभागाध्यक्ष उपस्थित होते. तसेच, जेएनपीटी-सेझ मध्ये नुकतेच आपले ऑपरेशन सुरु केलेल्या सिमोसिस इंटरनेशनल आणि सर्वेश्वर लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेडला ही यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या. जेएनपीटी-सेझ मध्ये कार्यरत झालेल्या युनिट्सची संख्या आता सहा झाली आहे.

जेएनपीटी-सेझमध्ये उद्योगांसाठी भूखंड वाटप भू-व्यवस्थापनाच्या मार्गदर्शक धोरणानुसार ई-निविदा व ई-लिलाव प्रक्रियेद्वारे केले जाते. एनआयसीच्या सेंट्रल पब्लिक प्रॉक्यूरमेंट पोर्टल (सीपीपीपी) वर सक्षम अधिका-यांच्या मंजुरीने नुकतीच ई-निविदा व ई-लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. निविदा समितीच्या शिफारशी व सक्षम अधिकार्‍याच्या मंजुरीनुसार जेएनपीटी-सेझमधील नऊ निविदाधारक : सिनलाइन इंडिया लिमिटेड, डार्विन प्लॅटफॉर्म लॉजिस्टिक लिमिटेड, डार्विन प्लॅटफॉर्म शिपिंग लिमिटेड, दौंड शुगर पीव्हीटी लिमिटेड, एनव्हॉपॅप प्रायव्हेट लिमिटेड (पेपर प्लस टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड) आयजी इंटरनेशनल प्रायव्हेट लिमिटेड, महाराजा मर्चेंडाइज, एमईआयआर कमोडिटीज इंडिया प्रायव्हेट लि., आणि एसआरएस फार्मास्युटिकल्स प्रा. लि. या प्रक्रियेमध्ये यशस्वी ठरले.

याविषयी बोलताना जेएनपीटीचे अध्यक्ष श्री संजय सेठी, भा.प्र.से. म्हणाले, “जेएनपीटी-सेझसाठी ही एक अतिशय चांगली संधी असून आम्ही जेएनपीटी-सेझमध्ये जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचा विकास करीत आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब बनविण्यासाठी याठिकाणी आघाडीच्या जागतिक कंपन्या गुंतवणुक करतील. जेएनपीटी-सेझ हा जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधायुक्त प्रकल्प असून यासाठी सर्व नियामक मंजुरी प्राप्त झालेल्या आहेत, नवीन गुंतवणूकदारांसाठी अत्यंत फायदेशीर व सोयीचा असा हा प्रकल्प आहे. जेएनपीटी-सेझ मुळे व्यापार करने अजून सोपे होईल तसेच निर्मिति क्षेत्रास प्रोत्साहन मिळेल व जेएनपीटीला आयात-निर्यात व्यापार वर्गाचे पहिल्या पसंतीचे बंदर बनविण्यास मदत मिळेल.”

बंदर क्षेत्रातील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकारने विशेष लक्ष्य दिल्याने व यासाठीच्या नियोजित खर्चामध्ये वाढ केल्याने तसेच जागतिक बाजारपेठेत सहजतेने पोहचण्याचे मार्ग उपलब्ध झाल्याने सागरी उद्योगात गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढ झाली आहे. जागतिक स्तरावर भारतीय वस्तूंची स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी खर्चात कपात करणे, बंदरांमधून जलद गतीने, कुशलतापूर्वक व किफायतशिर मालवाहतूक करणे हे जेएनपीटी-सेझचे मुख्य उद्दीष्ट आहे. हे एसईझेड जागतिक दर्जाच्या जेएनपीटी बंदराजवळ असल्याने याठिकाणी आपला बेस तयार करण्यास इच्छुक कंपन्याना व्यवसायासाठी याचा लाभ होणार आहे. वाहतुकीचे योग्य व इंटरलिंक्ड जाळे त्याचबरोबर सुयोग्य नियोजन, सुविधांचे एकत्रीकरण आणि सेझच्या विकासामुळे देशाला लाभ होईल व बंदर आधारित औद्योगिकीकरण यशस्वी होईल.

जेएनपीटीने नवी मुंबई येथे स्वत:च्या मालकीच्या 277.38 हेक्टर क्षेत्रामध्ये बहु-उत्पादन विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) विकसित केले आहे. बंदर, नौकानयन व जलमार्ग मंत्रालयाच्या सागरमाला उपक्रमांतर्गत बंदर-आधारित औद्योगीकरणास सक्षम करून निर्यातीला चालना देणे हे या बंदर आधारित बहु-उत्पादन विशेष आर्थिक क्षेत्राचे (जेएनपीटी-सेझ) उद्दीष्ट आहे. एसईझेडमधील कंपन्यांना जागतिक दर्जाच्या पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जेएनपीटी कोणतीही कसर सोडत नाही.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *