ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

*वंध्यत्व (भाग 1) (वांझपणा )infertility*

June 14, 202114:38 PM 182 0 0

एखादा नारळ आपण बाजारात घेतो त्यावेळी त्याला वाजवून घेतो, *Pregnancy is not chance that is choice*, आपण बाळ राहण्यासाठी ज्यावेळी प्रयत्न करतो त्यावेळी दोघांच्या शरीराचा विचार करायचा असतो. दोघांच्या तपासण्या करून योग्य डॉ च्या मार्गदर्शन घेऊन गर्भ धारण करावा.
एखादे दांपत्य अपत्यहीन असण्याची दोन कारणे संभवतात: (१) गर्भधारणा न होणे व (२) वारंवार गर्भपात (किंवा मुदतपूर्व प्रसूती) होणे. यांपैकी वारंवार गर्भपात होण्याची कारणे व त्यांवरील उपचार मूलतः भिन्न आहेत [⟶गर्भपात]. गर्भधारणा न होण्यास वंधत्व असे म्हणतात. कमी-अधिक प्रमाणानुसार व कारणीभूत गोष्टी उपचारांनी बऱ्या होण्याच्या शक्यतेनुसार त्याचे परिपूर्ण वंध्यत्व (अजननक्षमता), गर्भधारणा होण्याची पूर्ण अशक्यता आणि न्यून जननक्षमता असे विभाजन करता येईल कधीही गर्भधारणा न होण्याच्या (प्राथमिक वंधत्वाच्या) कारणांपेक्षा एखाद्या वेळी गर्भधारणा होऊन नंतर वंधत्वाची तक्रार सुरू होण्याची (द्वितीयक वंधत्वाची) काही मुख्य कारणे भिन्न असतात.

योग्य वयोगटातील व मुले होण्याची इच्छा असलेल्या सर्व जोडप्यांपैकी सु. ८ ते १०% जोडप्यांत वंध्यत्व ही तक्रार आढळते आणि इतर १० ते १२% जोडप्यांना इच्छा असूनही एक किंवा दोनापेक्षा जास्त मुले होऊ शकत नाहीत. सर्वसाधरण सुधारलेले आरोग्य आणि श्रोणिशोथ (स्त्री जननमार्गाची दाहयुक्त सूज), क्षयरोग व इतर वंधत्वाला कारणीभूत होऊ शकणाऱ्या आजारांवर योग्य उपचारांची उपलब्धता यांमुळे (वंधत्वाचे) हे प्रमाण सर्वसाधारणपणे कमी होत असण्याची शक्यता आहे; परंतु भारतात श्रोणिशोथ व जननेंद्रियाचा क्षयरोग ही अजूनही वंधत्वाची प्रमुख कारणे आहेत.
*पुरुषातील कारणे*
अनेक वेळा याची कारणे पूर्णपणे कळू शकत नाहीत; परंतु सिद्ध झालेली व सुचविली गेलेली कारणे पुढीलप्रमाणे असतात. लिंगगुणसूत्रांतील (लिंग निर्धारित करणाऱ्या व आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून पुढील पिढीत नेणाऱ्या सूतासारख्या सूक्ष्म घटकांतील) किंवा इतर दोषांमुळे वृषणाची (पु-जनन ग्रंथीची) वाढ न होणे व शुक्राणूंचे उत्पादन न होणे; गुप्तवृषणता (एक वा दोन्ही वृषणे प्राकृत-सर्वसाधारण-रीतीने त्यांच्या मुष्कात म्हणजे बाह्य पिशवीत न उतरणे); गालगुंड व इतर तीव्र व्हायरसजन्य रोगांमुळे होणारा वृषणशोथ; अपघात, शस्त्रक्रिया किंवा क्ष-किरण प्रारणामुळे (तरंगरूपी ऊर्जेमुळे) वृषणाला किंवा त्याच्या रक्तपुरवठ्याला धक्का पोहोचणे; भट्टीजवळील काम, गरम पाण्याने वारंवार स्नान, घट्ट व कृत्रिम तंतूंची अंतर्वस्त्रे (आतील कपडे), वृषण नीला अपस्फीती (अपसामान्य सूज) इ. कारणांमुळे वृषणाचे तापमान जास्त राहणे; अर्बुदे (कोशिकांच्या-पेशींच्या-अत्यधिक वाढीमुळे मिर्माण होणाऱ्या गाठी), क्षय, ⇨उपदंश इ. वृषणाचे रोग; ⇨ अंतःस्त्रावी ग्रंथीचे (मुख्यतः अधोथॅलॅमस व पोप ग्रंथीचे) रोग, सर्वसाधारण अनारोग्य, आहारातील मोठ्या प्रमाणातील कमतरता (उपासमार, ब१२ व फॉलिक अम्ल या जीवनसत्त्वांची कमतरता), औषधे व विषारी द्रव्यांचे दुष्परिणाम इत्यादींमुळे वृषणाचे कार्य मंदावणे; वाढते वय आणि वृषण व शुक्राणू यांच्या विरूद्धची स्वयं-प्रतिपिंडे (शरीरात निर्माण होणारी प्रतिकारक प्रथिने) इत्यादी. (आ) अपघात, शस्त्रक्रिया, शोथ [मुख्यताः परमा; ⟶परमा] आणि जन्मजात अभाव किंवा कमी वाढ यांमुळे पुरुष जननमार्गात (अधिवृषण, रेतवाहिनी, स्खलनवाहिनी इ.) दोन्ही बाजूंना अडथळा असणे. (इ) खूप जास्त किंवा खूप कमी प्रमाणातील वीर्यद्रव, जास्त श्यानता (दाटपणा), कमी प्रमाणात फ्रुक्टोज, जास्त प्रमाणात ⇨ अष्ठीला ग्रंथीचा स्त्राव (प्रोस्टाग्लँडीन) इ. वीर्यद्रवातील दोष आणि (ई) शिश्नोत्थान असमर्थता, शिश्नाच्या रचनात्मक विकृती (निरूद्धमणी, अधश्छिद्रता इ.), अकाल वीर्यस्खलन, पश्व वीर्यस्खलन, कष्ट समागम व अज्ञानामुळे प्राकृत समागम होऊ न शकल्याने योनिमार्गात शुक्राणू सोडण्याची असमर्थता [⟶लैंगिक वैगुण्ये] ही पुरुषांत आढळणारी वंध्यत्वाची कारणे आहेत.

https://indianfast.com/

https://indianfast.com/

*स्त्रियांतील कारणे*
(अ) वारंवार व गर्भधारणेस योग्य अंड (स्त्रीबीज) तयार करण्याची असमर्थता. या गोष्टीबरोबरच सहसा मासिक पाळी न येणे (अनार्तव) किंवा दीर्घ कालानंतर, अनियामित व थोड्या प्रमाणात येणे (आर्तवन्यूनता) या तक्रारी आढळतात व त्यांची कारणे एकच असतात [⟶ऋतुस्त्राव व ऋतुविकार]. मासिक पाळी नियमित असताना सहसा अंड तयार होत असते. क्वचित होत नसल्यास त्याचे कारण नेहमीच्या परीक्षांनी निदान न होणारी ⇨ अविवृक्क ग्रंथीची निष्फलता किंवा ब१२ जीवनसत्त्वाची कमतरता हे असू शकते. (आ) श्रोणि-पर्युदरशोथ (गर्भाशय व अंडवाहिनी यांच्या भोवती असलेल्या उदरगुहेतील अस्तरासारख्या पटलाचा शोथ), आंत्रपुच्छशोथ (अँपेंडिसायटीस) किंवा गर्भपात वा प्रसूतीनंतर होणाऱ्या संसर्गामुळे श्रोणिसोथ होऊन परिणामी तयार होणाऱ्या बंधांमुळे अंड अंडाशयाकडून अंडवाहिनीत जाण्यास अडथळा येणे. (इ) परमा, गर्भपात व प्रसूतीनंतरच्या संसर्ग किंवा क्षयरोगजन्य अंडवाहिनीशेथय; अंडवाहिन्यांचे जन्मजात दोष (हे गर्भाशय विकृतींबरोबरच आढळतात) व गर्भाशय-अंडवाहिनी संधि-संकोच (हे सैद्धांतिक कारण) यांमुळे दोन्ही अंडवाहिन्या पूर्ण किंवा अर्धवट बंद असणे किंवा अकार्यक्षम असणे हे वंध्य असलेल्यांपैकी १०% जोडप्यांतील प्रमुख कारण असते. (ई) गर्भाशय नसणे, अपुरी वाढ व गर्भाशयाच्या मोठ्या विकृती व क्षयरोगजन्य गर्भाशयांतःस्तरशोथामुळे शुक्राणूंना अडथळा किंवा गर्भधारणा झालेले अंड स्वीकारून वाढविण्याची गर्भाशयाची असमर्थता. (उ) गर्भाशय-ग्रीवेचे (गर्भाशयाच्या मानेसारख्या भागाचे) रोग (उदा., दीर्घकालिक गर्भाशय ग्रीवाशोथ व क्षरण), प्रसूती, गर्भाशय-ग्रीवेवरील शस्त्रक्रिया (उदा., गर्भाशय-ग्रीवांगच्छेदन), गर्भाशय भ्रंश (नेहमीच्या स्थानापसून ढळलेले गर्भाशय), पश्चवक्री (नेहमीच्या अक्षाच्या मागील बाजूस झुकलेले) गर्भाशय व गर्भाशयातील इतर दोष आणि मांसवृद्धी (सुजलेल्या व अतिवृद्धी झालेल्या पटलाचा पुढे आलेला भाग) व अर्बुदे यांमुळे गर्भाशय-ग्रीवामार्ग चिंचोळा व वेडावाकडा होणे, त्याच्या रचनेत बदल होणे व त्यातील श्लेष्मलाच्या बुळबुळीत द्रव्याच्या) गुणधर्मांत शुक्राणूंना पार करण्यास अवघड होण्यासारखे फरक पडणे यांमुळे शक्राणूंना गर्भाशय-ग्रीवेचा होणारा विरोध. (ऊ) योनिमार्गातील अर्बुदे, पापुद्रे, पडदे व बंध आणि जन्मजात दोषांमुळे समागमाला व शुक्राणू गर्भाशय-ग्रीवेपर्यंत पोहोचण्याला होणारा अडथळा. (ए) एरवी कारण समजू न शकणाऱ्या वंध्यत्वामध्ये शुक्राणूंना (किंवा अंडाला) शारीरिक विरोध हे कारण देण्यात येते. शुक्राणु किंवा अंड यांच्या विरूद्ध असणारे स्थानिक किंवा रक्तातील प्रतिपिंड हे त्यामागील कारण समजण्यात येते. (ऐ) तपासणीस आलेल्या जोडण्यांपैकी ३ ते ५% स्त्रियांत श्रोणीतील अर्बुदे (विशेषतः गर्भाशयातील स्नायु-अर्बुदे) व ५% स्त्रियांत गर्भाशयांतःस्तरीभवन (सामान्यतः अंतःस्तर जेथे नसतो तेथे कार्यकारी गर्भाशयांतःस्तर ऊतक म्हणजे कोशिका समूह आढळणे) हे वंध्यत्वाचे कारण असते.
*समागमातील दोष*
[⟶ लैंगिक वैगुण्ये]. यांतील काहींचा उल्लेख पुरुषांतील कारणे व स्त्रियांतील कारणे यांत वर आलाच आहे. त्याशिवाय समागमाच्या वेळी वंगण म्हणून वापरण्यात येणारे काही पदार्थ त्यांच्या अम्लतेमुळे किंवा तेलकटपणामूळे किंवा त्यातील रासायनिक द्रव्यांमूळे शुक्राणूमारक किंवा शुक्राणुस्थापक (शुक्राणूंची हालचाल थांबविणारे) असतात. त्याचप्रमाणे समागमाची कमी वारंवारता आणि समागम व अंडनिर्मितीचा काल यांची सांगड न जमणे या गोष्टीही वंध्यात्वाला कारण होऊ शकतात.
*उपचार*
*पंचकर्म उपचार करून आपण दोघांमधील दोष काढून आपण खात्रीशीर गर्भधारणा देऊ शकतो.*
पत्ता
*डॉ शिवाजी काळेल* (MD.BAMS)
*डॉ. संत पांडे* BAMS
*डॉ. विजय सिंग* BAMS

*साई सिद्धी पंचकर्म सेंटर*
शिवाजीनगर, गोवंडी. मुंबई 400043
*मोबाईल :9594880380*
*वंध्यत्व (वांझपना) Infertility* भाग 2 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 🌹 *पहिल्या भागात आपण पहिले की ‘pregnancy is choice not chance’, गर्भ न राहण्याची कारणे. ह्या भागात आपण आवश्यक असणाऱ्या तपासण्या व उपचार ह्यावर विवेचन करणार आहोत*
वंध्यत्वासाठी तपासण्या कधी सुरू कराव्यात या बाबतीत एकमत नाही. काहींच्या मते जोडप्याने वैद्यकीय सल्ला विचारताच तपासण्या सुरू कराव्यात, तर काहींच्या मते लग्नांतर तीन वर्षे (अंदाजाने निवडलेला कालावधी) मूल न झाल्यासच त्याला वंधत्व समजून तपासण्या सुरू कराव्यात. याबाबत निश्चित नियम नसून प्रत्येक जोडप्याच्या तक्रारीचे स्वरूप व तपासण्या करण्याची निकड लक्षात घेऊन तपासण्या सुरू केल्या जातात.

https://indianfast.com/

https://indianfast.com/

गर्भनिरोधक साधने न वापरता प्राकत व पुरेसा वारंवार समागम करणाऱ्या चांगल्या जननक्षम जोडप्यांतील बहुतेक स्त्रियांना ६ ते ७ महिन्यांपर्यंत गर्भधारमा होते व एक वर्षाच्या आत अशा अंदाजे ८०% स्त्रियांना गर्भधारणा होते. त्या दृष्टीने दृष्टीने लग्नानंतर साधारण २ वर्षे इच्छा असूनही गर्भधारणा न झालेल्या जोडप्यांची पूर्ण तपासणी सुरू करण्यास हरकत नाही. वाढते वय (उशीरा झालेले लग्न, दुसरे लग्न इ.) व तत्सम इतर कारणे असल्यास त्याआधीही तपासण्या सुरु करणे आवश्यक असते. एरवी जोडप्याची शारीरिक तपासणी करून ढोबळ दोष न आढळल्यास काही वाट बघणे शक्य असते. या तपासण्या विशिष्ट कारणे असल्याशिवाय लग्नाआधी केल्या जात नाहीत (कारण जननक्षमता विशिष्ट जोडप्याच्या संदर्भात असल्याने एकट्या व्यक्तीच्या संदर्भात ती अजमावणे म्हणजे तिचे मूल्यांकन करणे कठीण असते). तसेच गर्भधारणा अनुचित ठरविण्याइतक्या मोठ्या रोगाने [उदा., हृदय विकार, उच्च रक्तदाब, वृक्कशोथ (मूत्रपिंडाचा शोथ), काही सांसर्गिक रोग इ.] स्त्री ग्रस्त नाही याची तपासण्या सुरू करण्याआधी करून घेणे इष्ट असते.
जोडप्यातील दोघांचीही संपूर्ण वैद्यकीय तपासणी
दोघांनाही खाजगीत विचारलेल्या वैद्यकीय इतिहासात प्रामुख्याने एकत्र असण्याचा वा नसण्याचा कालावधी, समागम प्राकृत, वेदनारहित व पुरेसा वारंवार होतो का आणि ऋतुचक्राच्या कोणत्या कालावधीत होतो, स्त्रीचे ऋतुचक्र, जननेंद्रियांचे पूर्वीचे व सध्याचे रोग, इतर मोठे रोग, शस्त्रक्रिया व अपघात, कुटुंबातील आनुवंशिक किंवा क्षयासारखे सांसर्गिक रोग इ. गोष्टींची माहिती मिळविली जाते. शारीरिक तपासणीत इतर तंत्रांच्या (संस्थांच्या) सर्व तपासण्यांबरोबरच जननेंद्रियांच्या तपासणीवर मुख्य भर दिला जातो. खाली दिलेल्या पुरुषांच्या जननक्षमतेच्या तपासण्यांव्यतिरिक्त सर्वसाधारण रक्त तपासणी व जरूरीप्रमाणे इतर रक्त तपासण्या, मूत्र तपासणी, रक्तगट, उपदंशासाठी रक्त तपासणी, जरूरीप्रमाणे छातीचे क्ष-किरण छायाचित्र वगैरे तपासण्या वगैरे तपासण्या दोघांच्याही बाबतीत केल्या जातात.
पुरुषाच्या जननक्षमतेचे मूल्यमापन
पितृत्व हा जननक्षमतेचा पुरावा आहे. त्यामुळे वय व नंतर उद्भवलेल्या रोगांचा परिणाम सोडल्यास गर्भधारणेला कारणीभूत झालेला पुरूष पुरेसा जननक्षम समजण्यास हरकत नाही; परंतु अशा पुरुषांतही वीर्य तपासणीवरून कमीl जननक्षमतेचे पुरुष आढळतात. तसेच वीर्य-तपासणी सोपी, बिनत्रासाची, कमी खर्चाची व वारंवार करता येण्यासारखी असते म्हणून वंधत्वाच्या सर्व जोडप्यांमध्ये प्रथम या तपाससणीवरून पुरुषाच्या जननक्षमतेचा अंदाज आल्याशिवाय स्त्रियांच्या तुलनेने अवघड, जास्त खर्चाच्या, बहुधा शस्त्रक्रियेची व भूल देण्याची आवश्यकता असलेल्या आणि म्हणून तुलनेने जास्त धोक्याच्या असलेल्या तपासण्या केल्या जात नाहीत.

*वीर्य-तपासणी*: कमीत कमी दोन दिवस समागम टाळल्यानंतर हस्तमैथुनाच्या साहाय्याने (किंवा खंडित समागमानंतर) स्वच्छ व कोरड्या काचपात्रात वीर्य मिळविले जाते आणि वातावरणीय तापमानात थोडा वेळ (अंदाजे अर्धा तासपर्यंत) ठेवून ते पातळ झाल्यावर लगेच, १ तासानंतर व २ तासानंतर असे तीनदा ते तपासले जाते. वीर्याच्या गुणधर्मांत व शुक्राणू संख्येत मोठ्या प्रमाणात आणि वारंवार बदल घडत असल्याने एका तपासणीचा निकाल कमी जननक्षमतादर्शक आल्यास तपासणी कमीत कमी दोन वेगवेगळ्या वेळी केली जाते. या तपासणीत एका वेळी मिळालेल्या एकूण वीर्याचे घनफळ प्रमाण, शुक्राणू संख्या, शुक्राणूंची हालचाल, त्यांची रचना व एकूण शुक्राणूंत पूर्ण वाढीच्या व प्राकृत रचनेच्या शुक्राणूंचे प्रमाण या गोष्टी पाहिल्या जातात. तसेच वीर्यातील फ्रुक्टोजाचे प्रमाण, वीर्याची श्यानता व पू कोशिकांचे शोथ-प्रक्रियानिदर्शक अस्तित्व याही गोष्टी पाहिल्या जातात. या सर्वांत शुक्राणू घनता (एक मिली. वीर्यातील शुक्राणूंची संख्या) जास्त महत्त्वाची ठरते (ती सहा ते दहा कोटींपर्यंत असल्यास चांगली समजली जाते; परंतु एक कोटी इतकी कमी असलेलीही पुरेशी ठरू शकते. त्यातील प्राकृत रचनेच्या व चांगली हालचाल असलेल्या शुक्राणूंचे प्रमाण ५० ते ७५ टक्क्यांपर्यंत असणे पुरेसे समजले जाते). वीर्य-तपासणीच्या निकालाचा अन्वयार्थ सावधतेने लावावा लागतो व सर्वसाधारण ढोबळ मानानेच जोडप्यास सांगितला जातो.
*वृषण जीवोतक परीक्षा*: जीवोतक परीक्षा म्हणजे जिवंत शरीरातून घेतलेल्या ऊतकांची स्थूलमानाने व सूक्ष्मदर्शकाने केलेली तपासणी). वारंवार केलेल्या वीर्य-तपासणीत शुक्राणू न आढळल्यास (किंवा अत्यल्प प्रमाणात आढळल्यास) ही तपासणी केली जाते. त्यावरून वीर्यातील शुक्राणूंच्या अभावाचे कारण समजण्यास मदत होते वृषणात शुक्राणू उत्पादन न आढळल्यास त्याचे कारण शुक्राणू उत्पादक नलिका प्राकृत असूनही (अंतःस्त्रावी ग्रंथींच्या व इतर दोषांमुळे) अनुत्तेजित आहेत का त्याच (वाढ न झाल्याने किंवा रोगग्रस्त असल्याने) अकार्यक्षम आहेत हे ठरविता येते. तसेच वृषणातील शुक्राणू उत्पादन प्राकृत आढळल्यास पुढील जननमार्गातील वाहिन्यांत अडथळा असल्याचे निदान करता येते.

*इतर तपासण्या*: वृषण जीवोतक परीक्षेत शुक्राणू उत्पादनाचा अभाव आढळल्यास गुणसूत्राचा अभ्यास, कवटीची क्ष-किरण प्रतिमा (पोष ग्रंथीचे स्थान असलेल्या खोगीरासारख्या खोलगट भागाची रचना पाहाण्यासाठी), लिंग हॉर्मोनांचे (उत्तेजक स्त्रावांचे) व इतर हॉर्मोनांचे रक्तातील प्रमाण पाहाणाऱ्या तपासण्या इ. तपासण्या केल्या जातात आणि त्या मुख्यतः त्या पुरुषाच्या वंध्यत्वापेक्षाही त्याचे आरोग्य सुधारण्यासाठी केल्या जातात.

स्त्रीच्या जननक्षमतेचे मूल्यमापन:अंडवाहिन्यांचा खुलेपणा ठरविणाऱ्या तपासण्या: गर्भधारणा झालेल्या अंडास धक्का पोहोचू नये व अंतर्कीलनाची (रक्ताची गुठळी किंवा इतर बाह्य पदार्थ रोहिणीत वा नीलेत अकस्मात अडवून तेथील रक्तप्रवाह बंद पडण्याची) शक्यता उद्भवू नये यासाठी या प्रकारच्या तपासण्या मासिक पाळीच्या ७ ते १० दिवसांदरम्यान व गर्भाशयातून कोणताही रक्तस्त्राव होत नसताना केल्या जातात.
*उपचार*
वंध्यत्व हा व्यक्तिगत प्रश्न नसून जोडप्यांचा प्रश्न असतो व त्या जोडप्याच्या संदर्भात विशिष्ट असतो. त्यामुळे जोडप्यातील दोघांचा एकत्रित विचार करून, त्या जोडप्यासंदर्भात समजलेली वंध्यत्वाची कारणे एक-एक करून दूर करण्याचा प्रयत्न करण्याच्या दृष्टीने विशिष्ट उपचारांची आखणी केली जाते.

तपासणीत सहज आढळलेल्या इतर रोगांवर उपचार करून जोडप्याचे सर्वसाधारण आरोग्य प्रथम सुधारले जाते. त्यात मुख्यतः अतिश्रम, शारीरक व मानसिक ताण व अस्वास्थ्य, अतिस्थूलपणा, मद्यपान, धूम्रपान, शरीरातील पूतिकेंद्रे (पू उत्पन्न करणारे व इतर रोगकारक सजीव वा त्यांची विषे यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असलेली स्थाने) इत्यादींकडे लक्ष पुरविले जाते व विशिष्ट उपचार त्यानंतर सुरू केले जातात.

कित्येक वेळा, विशेषतः वंधत्वाची तक्रार फार लवकर केली जात असल्यास व दोघांच्या शारीरिक तपासणीत दोष न आढळ्यास धीर देणे, गर्भधारणेमागील शरीरक्रियाविज्ञान प्राथमिक स्वरूपात समजावून देणे व प्राकृत जननक्षमता असलेल्या जोडप्यांतील गर्भधारणेच्या शक्यतेच्या सर्वसाधारण प्रमाणाची माहिती देणे उपयुक्त व पुरेसे असते.

वर वर्णन केलेल्या तपासण्यांचा बऱ्याच वेळा उपचार म्हणूनही उपयोग होत असल्याने प्रत्येक तपासणीनंतर काही काळ गर्भधारणा होण्याची वाट पाहणे (त्या तपासणीत वंधत्वाचे इतर कोणते विशिष्ट कारण सापडलेले नसल्यास) हितावह असते. एकूण सर्वच उपचार वैद्याने धीराने व कौशल्याने करावे लागतात आणि जोडप्यालाही धीर धरण्यास व आशादायक दृष्टिकोन ठेवण्यास सांगणे आवश्यक असते. तसेच उपचार करतात इतर गोष्टींबरोबरच जोडप्याच्या मानसिक, भावनिक, कौटुंबिक व सामाजिक आरोग्याचेही भान ठेवावे लागते.
पतीवरील उपचार
(१) शिश्नोत्थान असमर्थता (नपुंसकत्व) व अकाल वीर्यस्खलन यांवरील उपचार प्रामुख्याने मानसिक स्वरूपाचे असतात [⟶लैंगिक वैगुण्ये].

(२) दोषास्पद किंवा कमी प्रमाणतील शुक्राणू उत्पादन आणि वीर्यात शुक्राणूंचा अभाव यांवरील उपचार सर्वसाधारणपणे फारसे समाधानकारण नसतात; परंतु सर्वसाधारण आरोग्य सुधारणे, अतिस्थूलपणा व व्यसनाधीनतेवर उपचार करणे आणि अष्ठीला ग्रंथी, मूत्रमार्ग व जननेंद्रिये यांच्या संसर्गावर उपचार करणे यांमुळे सुधारणा होते. वृषण थंड राहण्यासाठी घट्ट व कृत्रिम तंतूची अंतर्वस्त्रे न वापरणे, उष्ण वातावरणात सलग फार काळ काम न करणे, थंड पाण्याने स्नान करणे व वृषण थोडा वेळ थंड पाण्यात बुडवून ठेवणे हे उपचार उपयुक्त ठरतात. क्लोमिफेन या औषधाचा शुक्राणू उत्पादन वाढविण्यास उपयोग होऊ शकतो. वृषण प्राकृतपणे कार्य करणारे असून पोष ग्रंथी अधोथॅलॅमस पातळीवर स्पष्ट दोष आढळल्यास पोषक हॉर्मोने (उदा., पुटकोद्दिपक हॉर्मोन) उपयुक्त ठरतात. ब१२ व फॉलिक अम्ल ही जीवनसत्वे शुक्राणुंच्या परिक्कतेसाठी आवश्यक असल्याने त्यांच्या उपचारांचा उपयोग होत असावा. अनुभवात्मक ज्ञानावर आधारित ई जीवनसत्तव व लहान मात्रेमध्ये ⇨अवटू ग्रंथीच्या हॉर्मोनाचा (थायरॉक्सिनाचा) उपचार केला जातो; परंतु त्यांची व टेस्टोस्टेरोन या वृषणजन्य हॉर्मोनाची उपयुक्तता शास्त्रीय पायावर सिद्ध झालेली नाही. वरील वैद्यकीय उपचारांची उपयुक्तता ठरवणे अवघड आहे. कारण शुक्राणूच्या परिपक्कतेस सहा आठवडे लागत असल्याने औषधाने पडलेला फरक त्यानंतरच समजतो. तसेच वीर्याचा दर्जा एकाच व्यक्तीत वेळोवेळी अचानक बदलत असल्याने उपचार व शुक्राणू संख्येतील वाढ यांच्यातील स्पष्ट कार्य-कारणभाव सिद्ध करणे अवघड असते.

(३) वृषण नीला अपस्फीतीसाठी केलेली शस्त्रक्रिया उपयुक्त ठरते; परंतु शस्त्रक्रिया करताना वृषणाच्या रक्तपुरवठ्याला धक्का पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी लागते.

(४) अधिवृषणातील किंवा रेतवाहिनीतील अडथळ्यामुळे वीर्यात शुक्राणूंचा अभाव असल्यास त्या क्षेत्रातील तज्ञ वैद्याने केलेली शाखांतरीय शस्त्रक्रिया उपयुक्त ठरते.
पत्नीवरील उपचार
(१) स्त्रीचे सर्वसाधारण आरोग्य सुधारणे, जननेंद्रियांची स्वच्छता राखणे व जननेंद्रियांचे रोग: विशेषतः उपदंश, क्षय व इतर संसर्गजन्य रोग आढळले असल्यास त्यांवर पूर्ण उपचार करणे महत्त्वाचे असते. समागमापूर्वी खाण्याच्या सोड्याच्या विद्रावाने किंवा रिंगर लॅक्टेट विद्रावाने (मीठ, सोडियम लॅक्टेट, कॅल्शियम क्लोराइड व पोटॅशियम क्लोराइड यांच्या शुद्ध पाण्यातील आणि सिडनी रिंगर या इंग्लिश शरीरक्रियावैज्ञानिकांच्या नावाने ओळखण्यात येणाऱ्या विद्रावाने) योनीमार्ग आतून धुणे हा अनुभव सिद्ध उपचार उपयुक्त ठरू शकतो.

(२) हॉर्मोनांचे उपचार: अंडमोचन असमर्थता खात्रीपूर्वक सिद्ध झालेली असल्यास व अंडकोशात उद्दीपन देण्याजोगी अंडे असल्यासच या प्रकारचे उपचार आवश्यक व उपयुक्त ठरतात. अशा रुग्णांतच सहसा पाळी न येणे आणि अनियमित, जास्त कालावधीने किंवा कमी प्रमाणात पाळी येणे याही तक्रारी आढळतात. स्त्री-हॉर्मोनांचे (स्त्रीमदजन व प्रगर्भरक्षी) चक्रीय उपचार, क्लोमिफेन किंवा पोषक हॉर्मोनांचे उपचार हे ऋतुचक्राच्या हॉर्मोन संतुलनातील बिघाडाची नक्की पातळी शोधून त्याप्रमाणे करावे लागतात (पूर्ण तपासण्यांच्या अभावी अनुमानधपक्याने व अनियंत्रितपणे केलेले हॉर्मोनांचे उपचार अयोग्य, निरुपयोगी व प्रसंगी धोकादायक ठरतात.). अधोथॅलॅमस-पोष ग्रंथी तंत्राच्या बिघाडामुळे किंवा असंतुलित कार्यामुळे स्तनांतून अवेळी दुग्धस्त्राव होणे व ऋतुकाल न येणे यांसारखी लक्षणे आढळल्यास ब्रोमीक्रिप्टीन या औषधाचा उपयोग होऊ शकतो.
*जन्मतः स्त्री शुक्रधातूच्या दृष्टीने असार असली व तिच्या असारत्वाची चिकित्सा झाली नाही, तर योनीची व गर्भाशयाची वाढ नीट होत नाही. अशा स्त्रीला गर्भधारणा होत नाही. ती वांझ असते.
*स्त्रीचा असार शुक्रधातू बलवान व्हावा आणि त्याच्या वृद्धीने जननेंद्रियाची वाढ चांगली व्हावी ह्याकरिता शुक्रवृद्धीची (वाजीकरण) औषधे तिला द्यावीत [⟶वाजीकरण]. अर्थात आयुर्वेदाचा एक नियम ह्याही ठिकाणी लक्षात ठेवावा, योग्य तऱ्हेने शरीराची वामके, रेचके इ. देऊन शुद्धी करून दिली पाहिजे, ह्याला पंचकर्मं चिकित्सा म्हणतात. ह्या उपचाराने दोघातील दोष काढून टाकले जातात.*

*वात, पित्त व कफ ह्या प्रत्येक दोषाने, दोन दोन दोषांनी, तिन्ही दोषांनी आणि रक्त दृष्टीने दुष्ट असेल, तर स्त्रीबीज उत्पन्न होत नाही म्हणून ती वांझ असते. ह्यांपैकी एकेक दोषांनी दुष्ट व रक्ताने दुष्ट जे रज असते त्या स्त्रियांचे दोष नाहीसे होऊ शकतात. शरीर शुद्धी करून घेतल्यानंतर दोषांना अनुसरून योनी-धावने वापरावीत, त्याच प्रमाणे औषधांच्या काढ्यांमध्ये भिजविलेले कापसाचे बोळे योनीत ठेवावेत, त्याचप्रमाणे त्याच औषधांचा बस्ती योनीमध्ये द्यावा.त्याच प्रमाणे पुरुषाला वाजीकरण चिकित्सा केली जाते. आपल्या पंचकर्मं चिकित्सा केंद्रात वरील उपचार होतात* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 🌹

*डॉ शिवाजी काळेल* (MD.BAMS)
*साई सिद्धी पंचकर्म सेंटर*
शिवाजीनगर, गोवंडी. मुंबई 400043
*मोबाईल :9594880380*

Categories: आरोग्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *