ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

पावसाळी खरेदीलाही महागाईची झळ; छत्री, रेनकोटच्या किमतीत १५ ते २० टक्क्यांची वाढ

June 12, 202213:44 PM 25 0 0

उरण ( संगिता पवार ) : राज्यात मान्सूनचे आगमन झाले असल्याने उरण शहरात रेनकोट आणि रंगबेरंगी छत्र्या प्लास्टिक पत्रे,,बॅग कव्हर ,ताडपत्री खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू आहे. दोन वर्षापासून लॉक डाऊन मुळे आर्थिक कचाट्यात सापडलेल्या कित्येक व्यावसायिकांनी आपली दुकाने गुंडाळली होती. मात्र आता पुन्हा बाजार पेठा सजल्या आहेत. मात्र रशिया – युक्रेन युद्धामुळे इंधनाचा भडका उडाल्याने छत्री , रेनकोटच्या किमती १५ ते २० टक्क्यांनी वाढल्या आहेत.जिल्ह्यात अनेक खाजगी शाळा सोमवार पासून सुरु झाल्या आहेत पुढील आठवड्या पासून सरकारी शाळाची घंटा वाजणार असल्याने पालकांनी विद्यार्थ्यांच्या पावसाळी खरेदी सुरु केली आहे.
रेनकोट किंवा छत्री घेतल्याशिवाय नोकरदार वर्ग विद्यार्थी घराबाहेर पडू शकत नाहीत त्यामुळे रेनकोट ,छत्र्या ,पावसाळी टोप्या ताडपत्रीच्या दुकानामध्ये गर्दी होत आहे .मात्र गत वर्षीच्या तुलनेत यंदा छत्री व रेन कोट चे दर १५ ते २० टक्क्यांनी वाढले आहे . युवावर्गात विविध रंगाच्या छत्र्याची केंद्र असते बाजारात प्रिंटेड, एक, दोन, तीन फोल्डिंग आमी सिल्वर, रेम्बो मल्टीकलर, फैमिली पेंशन छत्री पारदर्शक हट अबता उपलब्ध आहेत. लहान मुलांचे आकर्षण असलेल्या रेनकोटमा कार्टूनस्टर फ्लोरोसेंटअश्या प्रकारात बाजारात उपलब्ध आहेत .

इंधन वाहतूक मेटल व कापड यांचे वाढल्यामुळे पावसाळी माहित्याचे दर वाढले आहेत. मात्र आपल्याकडे पाऊस जास्त असल्याने खरेदीसाठी गर्दी होत आहे. दारात १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे .
मंगल जनरल स्टोअर ताराचंद जैन विक्रेता

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *