ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

रास्त भाव दुकांनाची आय.एस.ओ मानांकन तयारी अंतीम टप्प्यात जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांची माहिती

February 12, 202216:06 PM 42 0 0

सातारा हिरकणी (विदया निकाळजे) : सातारा जिल्ह्यातील रास्त भाव दुकानांना आता कॉर्पोरेट लूक येणार आहे. धान्य दुकानांचे आय.एस.ओ. मानांकन करण्यात येणार आहे. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. काही रास्त भाव दुकानदारांनी आपले रास्त भाव दुकान मानांकनासाठी तयार सुद्धा केले आहे. प्राथमिक स्वरुपात सातारा जिल्ह्यातील निसराळे येथील रास्त भाव दुकानास पुणे विभागीय उपायुक्त (पुरवठा) त्रिगुण कुलकर्णी यांनी स्वत: आय.एस.ओ. टिम सोबत नुकतीच पहाणी केली. त्यांच्या समवेत जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

निसराळे येथील रास्त भाव दुकानदार अशोकराव पिसाळ यांच्या दुकानास भेट देवून श्री. कुलकर्णी म्हणाले, हे दुकान गुणवत्तापूर्ण असून त्यांचा आदर्श इतर रास्त भाव दुकानदारांनी घ्यावा. आय.एस.ओ मानांकनामुळे रास्त भाव दुकानांचा पारंपारीक लूक बदलला जाणार असून रास्त भाव दुकानात स्वच्छता आणि पारदर्शी कामकाजाला प्राधान्य दिले जाणार आहे. रास्त भाव दुकानांसह सातारा जिल्ह्यातील सर्व शासकीय धान्य गोदामे, तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग, जिल्हा पुरवठा कार्यालय सुद्धा आय.एस.ओ. मानांकनाच्या दृष्टीने तयारी करीत आहे. याचेही उपायुक्त श्री. कुलकर्णी यांनी कौतुक केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *