ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

शिक्षक संघाची सहविचार सभा शनिवारी महेंद्र अवघडे यांची माहिती

July 22, 202212:18 PM 19 0 0

सातारा हिरकणी (विदया निकाळजे) : प्राथमिक शिक्षक संघाची सहविचार सभा शनिवार दि. २३ जुलै रोजी जिल्हा परिषद शाळा दहिवडी नं .१ येथे दुपारी २ वाजता आयोजित केली असल्याची माहिती माण तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष व शिक्षक बँकेचे उपाध्यक्ष महेंद्र अवघडे यांनी दिली.

या सभेमध्ये माण तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्यासंदर्भात आवश्यक पाठपुरावा करणे, संघटनात्मक बांधणी तसेच आगामी शिक्षक बँकेची निवडणूक याविषयी विचारविनिमय करण्यात येणार आहे.

 

तरी संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे असे आवाहन संचालक राजाराम खाडे यांनी केले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *