जालना (प्रतिनिधी) ः जालना येथील अत्यंत गाजलेल्या पाठक मंगल कार्यालयाचे मालक अमोल पाठक, त्यांची पत्नी वैशाली पाठक व मुलगा उज्वल पाठक यांची प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश, जालना यांनी भा.दं.संहितेच्या कलम 302 च्या आरोप मधून निर्दोष मुक्तता केली.
विशेष बाब म्हणजे सदरील खटला हा अत्यंत गाजला होता, कारण तक्रारदार यांनी सरकारी वकिलांना सहाय्य करण्याकरिता स्वतः देखील प्रथितयश वकिलांनी नियुक्ती केली होती, परंतु बचाव पक्षाचे वकील अॅड. अनिरुद्धराजे घुले पाटील यांनी खटला चालवीत असतांनाच अनेक तांत्रिक बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यांचे स्वतःचे वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षण यांचा पुरेपूर वापर करीत त्यांनी सरकार पक्षास नामोहरम करणारा युक्तिवाद केला व त्यांना अॅड. कृष्णा शर्मा, अॅड. सलमान डी. खान, अॅड. रमेश गाढे अॅड. श्वेता सेठीया आणि अॅड. शेखर पाटील यांनी संपूर्ण प्रकरणामद्धे अनेक बाबी मा.न्यायालयाच्या निर्दर्शनास आणून देण्यात मोलाची साथ दिली.
12 सप्टेंबर 2019 रोजी घडलेल्या पूजा यांच्या खुनाच्या प्रकरणात अमोल पाठक त्यांची पत्नी वैशाली पाठक मुलगा उज्वल पाठक यांना आरोपी करण्यात आले होते, या प्रकरणात त्यांना त्याच दिवशी अटक करण्यात आली होती.
सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला आणि नंतर मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने त्यांना जामीन दिला होता, तेव्हा पासून ते जामिनावर मुक्त होते. मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात देखील त्यांची बाजू अॅड. अनिरुद्ध राजे घुले पाटील यांनीच मांडली होती.
या संदर्भात अमोल पाठक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, न्यायसंस्था आपल्याला न्याय देणारच याची खात्री होती आणि नितीन कटारिया खून प्रकरणातील आरोपीची जामीन करणारे तसेच जळगाव अहमदनगर नांदेड इत्यादी ठिकाणच्या खून प्रकरणातील आरोपींना उच्च न्यायालयात जामीन मिळवून देणारे वकील म्हणून अॅड. अनिरुद्ध राजे यांचे नाव ऐकले होते. त्यांना कारागृहातून संपर्क केला व त्यांनी आमचा खटला जालना सत्र न्यायालयात चालवावा ही विनंती केली. पुढे बोलताना अमोल पाठक म्हणाले की, जामीन होईल याची आशा सुद्धा मी कधी ठेवली नव्हती, कारण जालना न्यायालयात अत्यंत नामांकित वकील असणार्या वकील साहेबांना देखील आमचा जामीन करता आला नव्हता. परंतु अॅड. अनिरुद्ध राजे आले आणि त्यांनी खटला स्वीकारल्या नंतर एका महिन्यात आम्हाला उच्च न्यायालयातून जामीन मिळवून दिला तेव्हाच मी ठरवले होते की, काहीही फिस लागली तरी, हरकत नाही परंतु आमचा खटला हेच वकील चालविणार आणि त्यांनी तो चालविला देखील. त्यांनी आमची निर्दोष मुक्तता केली. अॅड. अनिरुध्द घुले पाटील हे लढवित असलेल्या केसकडे सर्वांचे लक्ष लागून होते.
Leave a Reply