ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

नवोपक्रमशील शिक्षकांचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न.

September 3, 202114:09 PM 48 0 0

जालना/प्रतिनिधी : जानेवारी २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांच्या नवोपक्रम स्पर्धेतील क्रमांक पटकाविणाऱ्या शिक्षकांचा पारितोषिक वितरण सोहळा दि. ३१/०८/२०२१.रोजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डायट प्राचार्य डॉ. राजेंद्र कांबळे प्रमुख पाहुणे म वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनंत चौधरी हे तर व्यासपीठावर डायट ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. संजय येवते,डॉ. सुनिता राठोड, अधिव्याख्याता डॉ. विनोद राख, डॉ. शिवाजी साखरे,गटशिक्षणाधिकारी जाफराबाद डॉ. सतिश सातव उपस्थित होते.


जानेवारी महिन्यात जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या मार्गदर्शक सुचनानुसार आयोजित केली होती यात जिल्हातील प्राथमिक गटातून ऐकून ३१ तर माध्यमिक गटातून ९ शिक्षकांनी सहभाग नोंदविला होता. प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक बदनापूर तालुक्यातील जि.प. प्रा.शा. मेव्हणा येथील श्रीकांत ढगे यांच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण उपयुक्तता, द्वितीय क्रमांक अंबड तालुक्यातील जि.प. प्रा.शा. दोदडगाव येथील श्रीमती निता अरसुळ यांच्या चला बनूया कोरोना योद्धा, तृतीय क्रमांक बदनापूर तालुक्यातील जि.प. प्रा.शा. किन्होळा येथील श्रीमती भाग्यश्री म्हसे यांच्या लॉकडाउन काळातब्रेन बुस्टर चॅनेलने विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी केले ट्रेन, चौथा क्रमांक घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी तालुक्यातील जि.प. प्रा.शा.शिवणगाव येथील हेमराज रमधम यांच्या कोविड १९ समस्या नव्हे तर संधी…कुछ दाग अच्छे है, पाचवा क्रमांक परतुर तालुक्यातील जि.प. प्रा.शा. दहिफळ भोगांणे येथील पेंटू म्हैसनवड यांच्या कोविड १९ काळात टॅब व वायफाय डोंगलच्या साह्याने १०० टक्के मुलांचे शिक्षण, तर उत्तेजनार्थ जालना तालुक्यातील जि.प. प्रा.शा.घाणेवाडी येथील सोनाली खेरूडकर यांच्या अभ्यासक्रमाशी निगडीत प्रेरणादायी गोष्टींद्वारे श्रवण, आकलन, लेखन व संभाषण कौशल्य विकसन,व भोकरदन तालुक्यातील जि.प. प्रा.शा.उमरखेडा शाळेतील ज्ञानेश्वर झगरे यांच्या गल्ली मित्र साथीला, मोबाईल मदतीला, ओट्यावरच्या शाळेतून स्विकारु आव्हानाला विभागून देण्यात आला.
माध्यमिक व उच्च माध्यमिक , शिक्षक व मुख्याध्यापक गटातून प्रथम क्रमांक बदनापूर तालुक्यातील जि.प. प्रशाला शेलगाव येथील श्रीमती एम.आर.पाटील यांच्या छोटे सायंटिस्ट कुछ नया करे, द्वितीय क्रमांक भोकरदन तालुक्यातील सरस्वती विद्या मंदिर शेलूद येथील तुषार पडूळ यांच्या विद्यार्थी बचत बँक, तृतीय क्रमांक घनसावंगी तालुक्यातील मत्सोदरी विद्यालय पिंपरखेड येथील के.एस.घायतिडक यांच्या सत्यशोधक गृह अभ्यासिका यास,चौथा क्रमांक जालना तालुक्यातील डग्लस गर्ल्स हायस्कूल येथील श्रीमती कल्पना पाटील यांच्या पाठ्यपुस्तकावर आधारित कविता स्पर्धा, पाचवा क्रमांक घनसावंगी तालुक्यातील शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय मूर्ती येथील भीमाशंकर शिंदे चला समजून घेऊया ओनलाइन पद्धतीने विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयातील संकल्पना, तर उत्तेजनार्थ मंठा तालुक्यातील लाल बहादूर शास्त्री विद्यालय केंधळी येथील उत्तम धाबले यांच्या तंबाखू,गुटका,पुडी मुक्त शाळा या नवोपक्रमास देण्यात आला.या सोबतच राष्ट्रीय विज्ञानदिनानिमित्त झालेल्या ऑनलाईन विज्ञान प्रश्न मंजुषा या स्पर्धेचे आयोजित बक्षिस पात्र यश विद्यार्थ्यांना शिल्ड, ब प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विषय सहाय्यक जगन वायाळ,दिपक दराडे, श्रीकृष्ण निहाळ, कैलास तिडके, शेख गफार, सहशिक्षक जयंत कुलकर्णी साधन व्यक्ती प्रफुल्ल राजे, चंद्रकांत गोल्डे, प्रल्हाद सोलाटे,देवा चित्राल,कैलास गायकवाड,सी.बी.जाधव,करुणा हिवाळे,शितल मिसाळ,मिरा जगदाळे, एस.यु.गायकवाड.यांनी परिश्रम घेतले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *