जालना/प्रतिनिधी जालना सामाजिक वनिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी संगणमत करून, झाडे लावण्याच्याा कामात मोठी अफरातफर केली आहे. खड्डे खोदणे, झाडे लावणे यासाठी मजुर बोगस दाखवून, त्यांच्याकडून बँक पासबुक घेवून, खोटे रेकॉर्ड तयार केले. व खात्यावर पैसे जमा होताच काही मजुरांना व त्यांच्याकडून काही रक्कम अधिकाऱ्यांनीच घेतल्याचा गंभीर आरोप आहे. झाडे लावण्याच्या कार्यक्रमात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून, दोषींना निलंबीत करावे, अन्यथा भीम आर्मी (भारत एकता मिशन) च्या वतीने जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
याबाबत उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, जालना सामाजिक वनिकरण विभागाच्या श्रीमती तांबे, जाधव यांनी संगणमत करून, झाडे लावण्याच्या कामात खड्डे खोदणे, झाडे लावणे यासाठी बोगस मजुर कामांसाठी दर्शविले. व कामांवर नसतांनाही मजुरांना कामावर असल्याचे दर्शवून मजुरांना पैश्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून बँक पासबुक घेवून, खोटेनाटे रेकॉर्ड तयार केले. व पैसे बँकेच्या खात्यावर जमा झाल्यानंतर त्यांना थोडे पैसे देवून उर्वरीत पैसे सामाजिक वनिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला.
जालना शहरातील आर.पी.टी.एस. परिसर, कन्हैयानगर उद्यान, जामवाडी परिसरात झाडे लावण्याचे काम झाल्याचे दाखवून सदर कामांचे व रोपांचे, मजुरांचे बील उचलण्यात आले. सद्य स्थितीत 2-4 झाडे लावल्याचे दिसतात, इतर कोठेही झाडे लावलेली नाही. झाडांसह बोगस मजुर दाखविले व कोणतेही काम न करता बोगस बिल उचलल्याचा आरोप आहे. याप्रकरणात निपक्ष चौकशी करून, दोषीविरूध्द कारवाई करून, त्यांना निलंबीत करावे, नसता भीम आर्मी जालना जिल्ह्याच्या वतीने जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदनावर भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सुभाष दांडेकर, जिल्हा सचिव वामनराव दांडगे, महिला जिल्हाध्यक्षा रंजनाताई जाधव, संघटक अशोकराव पाडमुख आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Leave a Reply