पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी देहलीमध्ये टोकियो येथील ऑलिंपिक खेळून परतलेल्या १२७ भारतीय खेळाडूंशी जेव्हा प्रत्यक्ष संवाद साधला त्यावेळी एका वडीलधारी व्यक्तीसम सर्व प्रतिभावान खेळाडूंना दिशादर्शन करणारे होते. देशाच्या सर्वाेच्च पदावरील व्यक्तीने केलेली ही हितगुज निश्चितच सर्वांना प्रेरणादायी होती असे जाणवले. पंतप्रधानांच्या या कृतीतून प्रत्येकच भारतीय नागरिकाला त्याच्या क्षेत्रामध्ये चांगले कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळाली असणार.
पंतप्रधानांनी त्यांचे दिशादर्शन करत ‘तुम्ही एवढ्या लहान वयात ऑलिंपिक स्तरापर्यंत पोचू शकला, हे काय कमी आहे का ? पुढील वेळी प्रयत्न करा. तुम्हाला निश्चितच यश मिळेल’, असे सांगितले. त्याचबरोबर चातुर्मास चालू असल्याने ते एकाच वेळी अन्नग्रहण करतो असे सांगून त्यांनी हिंदु धर्माचरणाचे महत्त्व खेळाडूंच्या मनावर बिंबवले. बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू यांच्या कोरियाई प्रशिक्षकांशी संवाद साधतांना त्यांनी कोरिया आणि अयोध्या यांच्यातील ऐतिहासिक संबंधाविषयी आवर्जून माहिती देत अयोध्येला भेट देण्याविषयी त्यांना सांगितले. एकूणच या भेटीतून धर्माचरण, हिंदुत्व, क्रिकेट सोडून अन्य खेळांना प्रोत्साहन आदी गोष्टींबद्दल महत्वपूर्ण संवाद साधला गेला. पुढील ऑलिंपिकमध्ये सर्व भारतीय खेळाडूंची कामगिरी खूप छान राहील अशी आशा व्यक्त करूया.
डॉ. भारती अनिल हेडाऊ, यवतमाळ
Leave a Reply