ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

ब्रेक दि चेन अंतर्गत जिल्हादंडाधिकारी यांचे निर्देश जारी

June 27, 202114:15 PM 44 0 0

जालना दि.26-  राज्यामध्ये कोरोनाची आकडेवारी कमी  झाल्यानंतर शासनाने पाच टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिल केले होते. मात्र निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर काही दिवसातच कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचं समोर येत आहे. तसेच राज्यात Delta Plus (Variant of Concern) धोका देखील वाढू लागला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून या आधीच्या नियमावलीमध्ये बदल करण्यात आले असल्याने  प्र. जिल्‍हादंडाधिकारी तथा अध्‍यक्ष जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण, जालना अंकुश पिनाटे यांनी आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कायदा 2005, साथरोग अधिनियम 1897, फौजदारी प्रक्रीया संहिता 1973अन्‍वये प्राप्‍त अधिकारान्‍वये जालना जिल्‍हयात शासनाने दिलेल्‍या निर्देशांच्‍या अधीन राहून जालना जिल्ह्यात दि. 27 जून 2021 रोजी सकाळी 5.00 वाजेपासुन पुढील आदेशापर्यंत खालील प्रमाणे आदेशीत केले आहे.

1)       संचार बंदीः-फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम अन्‍वये कोणत्‍याही व्‍यक्‍तीस केवळ Medical Emergency वगळता सायंकाळी 5.00 ते सकाळी 5.00 वाजेपर्यंत मुक्‍तपणे संचार करण्‍यास मनाई राहील. तसेच संचारबंदी कालावधीत आरोग्‍य विभाग, पोलीस विभाग, महसुल विभाग, अग्‍नीशमन विभाग, महावितरण, नगरपालीका व नगर पंचायत कार्यालये, आपत्‍ती व्‍यवस्‍थापनाशी / कोविड विषयक कामकाजाशी संबंधीत सर्व कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांना ये-जा करण्‍यास सुट राहील. तथापी सर्व शासकिय अधिकारी/कर्मचारी यांनी ओळखपत्र बाळगणे आवश्‍यक राहील.

2)      जमावबंदीः- दररोज सायंकाळी 5.00 वाजे पावेतो सार्वजनिक ठिकाणी एकावेळेस 5 पेक्षा अधिक नागरीकांना एकत्र येण्‍यास मनाई राहील.(पुर्व परवानगी घेतलेले पुर्वनियोजित कार्यक्रम आणी लग्‍नसमारंभ, अंत्‍यविधी वगळुन)

3)      संपूर्ण जालना जिल्‍ह्याकरीता सुट देण्‍यात आलेल्‍या बाबींचा तपशिल खालील प्रमाणे आहे.

अ.क्र.सेवा/आस्‍थापना/उपक्रमवेळतपशिल
1अत्‍यावश्‍यक सेवेशी संबंधीत सर्व दुकाने, आस्‍थापना यांच्‍या वेळादररोज दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहील. (औषधी दुकाने पूर्णवेळ)सर्व अत्‍यावश्‍यक व बिगर अत्‍यावश्‍यक दुकानांच्‍या प्रवेशाच्‍या ठिकाणी/काउंटर समोर एका वेळी 5 पेक्षा जास्‍त ग्राहकांना प्रवेश राहणार नाही. दुकानाच्‍या आत सर्वांना Covid Appropriate Behavior चे पालन करणे बंधनकारक राहील.
2अत्‍यावश्‍यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने व आस्‍थापना यांच्‍या वेळासोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहील. शनिवार व रविवार पूर्णपणे बंद.
3मॉल्‍स, सिनेमा हॉल(मल्‍टीप्‍लेक्‍स व सिंगल स्क्रिनसह), नाट्यगृहपुर्णतः बंद
4रेस्‍टॉरन्‍टस50 % क्षमतेने सोमवार ते शुक्रवार दुपारी 4.00वाजेपर्यंत सुरु राहील आणि शनिवारव रविवार फक्‍त पार्सल/होम डिलेव्‍हरी सुरु राहील.सोमवार ते शुक्रवार केवळ दुपारी 4.00 वाजे पर्यंत Dining करीता सुरु राहतील. तथापी दुपारी 4.00 ते रात्री 9.00 वाजेपर्यंत केवळ पार्सल सुविधा/ Take Away/ घरपोच सुविधा देता येतील. तसेच शनिवार व रविवार Dining पुर्णपणे बंद राहील व केवळ पार्सल सुविधा/ Take Away/ घरपोच सुविधा देता येतील. Covid Appropriate Behavior चे पालन करणे बंधनकारक राहील.
5लोकल ट्रेन्‍सलागू नाही.
6सार्वजनीक ठिकाणे/

खुलीमैदाने/फिरणे/

सायकल चालवणे

दररोज सकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत सुरु राहील.
7खाजगी आस्‍थापना/कार्यालयेदुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील. सूट वर्ग वगळता.केवळ Workings Days करीता.
8कार्यालयीन उपस्थिती- शासकीय कार्यालयेसहित (सुट असलेली खाजगी कार्यालये)नियमीत कार्यालयीन वेळ50 % उप‍िस्थिती सह सुरु राहील.
9खेळ / क्रिडाप्रकारसकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत.केवळ Outdoor Sports साठी.
10चित्रीकरणबबल, सांयकाळी 5 नंतर बाहेर मनाई.Covid Appropriate Behavior चे पालन करणे बंधनकारक राहील.

 

11सर्वधर्मिय धार्मिक / प्रार्थना स्थळे.नागरीकांसाठी बंद.सर्वधर्मिय धार्मिक आणि प्रार्थना स्थळ सध्‍या नागरीकांसाठी बंद राहतील. सर्वधार्मिक आणि प्रार्थना स्थळामध्ये धार्मिक सेवा करणारे सेवेकरी यांना त्यांच्यापारंपारीक आणि धार्मिक सेवा करता येतील.
सामाजिक, राजकीयआणि सांस्‍कृतिक/ करमणुकीचे कार्यक्रम/मेळावे/धरणे/

आंदलने/मोर्चे,इ.

पुर्व परवानगीने. दुपारी 4 वाजेपर्यंत.सक्षम प्राधिकारी यांची पुर्व परवानगी आवश्‍यक.
12लग्‍न समारंभ50 व्‍यकतीCovid Appropriate Behavior चे पालन करणे बंधनकारक राहील.
13अंत्‍यसंस्‍कार /अंत्‍यविधी20 व्‍यकती
14बैठका/निवडणुक-स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था /सहकारी संस्‍था यांच्‍या सर्वसाधारण सभा.50 % क्षमतेनेCovid Appropriate Behavior चे पालन करणे बंधनकारक राहील.
15बांधकामकेवळ ऑनसाइट कामगार/मजुर किंवा कामगार/मजुरांनी दुपारी 4 वाजेपर्यंत निघून जावेकेवळ बांधकामाच्‍या ठिकाणी मजूर राहत असल्‍यास अशी बांधकामे सुरु राहतील तथापी दुपारी 4 वाजेनंतर मजुरांना ये-जा करण्‍यास मनाई राहील.
16कृषी  व कृषी पुरक सेवादररोज दुपारी 4 वाजेपर्यंतCovid Appropriate Behavior चे पालन करणे बंधनकारक राहील.
17ई-कॉमर्स- वस्‍तु व सेवादररोज सुरुअत्‍यावश्‍यक सेवा व इतर प्रकारच्‍या सेवांकरीता.
18व्‍यायामशाळा, केशकर्तनालय दुकाने, ब्‍युटी पार्लस्, स्‍पा, वेलनेस सेंटर्सदररोज दुपारी 4 वाजेपर्यंत.Covid Appropriate Behavior चे पालन करणे बंधनकारक राहील. 50 % ग्राहक क्षमतेसहकेवळ Pre Booking पध्‍दतीने वेळ घेतलेल्‍या ग्राहकांसाठी, AC चा वापर करण्‍यास मनाई राहील.
19सार्वजनीक वाहतूक व्‍यवस्‍था (बसेस)100 % आसन क्षमतेने.उभे राहून प्रवास करण्‍यास मनाई राहील. Covid Appropriate Behavior चे पालन करणे बंधनकारक राहील.
20मालवाहू वाहतुक (जास्तीत जास्त तीन व्यक्ती, चालक / मदतनीस /स्‍वच्‍छक किंवा इतर) प्रवाशांना लागू असेल्‍या सर्व नियमांसहनियमीत सुरु.Covid Appropriate Behavior चे पालन करणे बंधनकारक राहील.

(वाहन चालक/ क्लिनर/हेल्‍पर)

21खासगी वाहने/ टॅक्‍सी/ बसेस/ लांब पल्‍याच्‍या रेल्‍वे द्वारे प्रवाशांचा अंतर जिल्‍हा प्रवासनियमीत सुरु.मात्र, स्‍तर-5 वरील जिल्ह्यातून कुणी येत असेल तर ई-पास बंधनकारक असेल.
22उत्‍पादन घटक (निर्माण क्षेत्र) – निर्यात जबाबदा-या पुर्ण करण्‍याची आवश्‍यकता असलेली उद्योगक्षेत्र, लघु व मध्‍यम उद्योगासह युनीटस्.नियमीत सुरु.Covid Appropriate Behavior चे पालन करून.

 

23निर्माणक्षेत्र – अ) अत्‍यावश्‍यक वस्‍तु निर्माण करणारे उद्योग, ब) सातत्‍याने व निरंतर चालु असणारी उद्योगक्षेत्र, क) राष्‍ट्रीय सुरक्षेकरीता आवश्‍यक संसाधनांची निर्मिती करणारे उद्योग, ड) डाटा सेंटर, क्‍लाऊड सर्विसेस, माहिती व तंत्रज्ञान क्षेत्र इत्‍यादीनियमीत सुरु.Covid Appropriate Behavior चे पालन करणे बंधनकारक राहील.

 

24इतर सर्व निर्माणक्षेत्र जे अत्‍यावश्‍यक तसेच निरंतर उद्योग या सदराखाली समाविष्‍ठ नाहीत ते सर्व50 % कर्मचारी क्षमतेने, वाहतूक बबलCovid Appropriate Behavior चे पालन करणे बंधनकारक राहील.

 

कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी Covid Appropriate Behavior चे पालन करणे बंधनकारक राहील. मास्‍कचा वापर करणे, सॅनिटाझरचा वापर, शारिरीक अंतर पाळणे बंधनकारक करण्‍याची जबाबदारी मुख्‍य कार्यकारी अधिकारी, जिल्‍हा परिषद, जालना, पोलीस अधीक्षक, जालना, मुख्‍याधिकारी, सर्व नगर परिषद/नगर पंचायत जिल्‍हा जालना यांचेवर राहील, या यंत्रणांनी भरारी पथक तयार करून वरील प्रमाणे कार्यवाही होणेसाठी आवश्‍यक कार्यवाही करावी.

4)     तसेच कोरोना विषाणू संदर्भातील संभाव्‍य तीसरी लाट रोखण्‍याच्‍या अनुषंगाने जिल्‍हयातील विविध विभाग / यंत्रणांना खालील प्रमाणे आदेशीत करण्‍यात येत आहे.

1)       जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक, जालना व जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी, जि.प.जालना यांनी नागरीकांमध्‍ये जागरुगता निर्माण होण्‍याच्‍या दृष्‍टीने कोविड-19 लसीकरणाकरीता व्‍यापक प्रसिध्‍दी करावी. लसीकरणाकरीता पात्र असलेल्‍या नागरीकांचे 70 % लसीकरण पूर्ण करण्‍याच्‍या दृष्‍टीने काटेकोर नियोजन करावे व आवश्‍यक उपाययोजना पूर्ण कराव्‍यात.

2)      जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक, जालना व जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी, जि.प.जालना यांनी कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी टेस्ट-ट्रॅक-ट्रीट या पद्धतीचा व्‍यापक प्रमाणात वापर करावा.

3)      कोविड-19  विषाणूचा हवेतून प्रसाराचा गुणधर्म लक्षात घेता हेपा फिल्टर्स किंवा एक्झॉस्ट फॅनचा वापर करून वातानुकूलनाच्या उचित नियमांचे पालन करीत कामकाजाच्या ठिकाणांची व कार्यालयांची सुरक्षितता निश्चित करणे / Proper Ventilation असणे संबंधितांना बंधनकारक राहील.

4)     जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक, जालना व जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी, जि.प.जालना यांनी कोविड-19 आर.टी-पी.सी.आर तपासणीची संख्‍या वाढवावी.

5)      पोलीस प्रशासन/नगर पालीका/नगर पंचायत/संबंधीत विभाग यांनी नागरीक Covid Appropriate Behaviorचे पालन न करणाऱ्यांवर प्रभावीपणे दंडात्मक कारवाई करावी.

6)      पोलीस प्रशासन/नगर पालीका/नगर पंचायत/संबंधीत विभाग यांनीज्‍या कार्यक्रम/ समारंभ/ उपक्रमांमध्‍ये मोठया प्रमाणावर नागरीकांची गर्दी होणे, समुहामध्‍ये एकत्र येणे, इ. कार्यक्रम/ समारंभ/सोहळे/कार्यक्रम/उपक्रमांना परवानगी देण्‍याचे टाळावे.

7)     सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार जि.जालना यांनी त्‍यांच्‍या कार्यक्षेत्रात विशिष्‍ट भागात / गावामध्‍ये मोठया प्रमाणावर रुग्‍ण संख्‍या वाढत असल्‍याचे निर्दशनास आल्‍यास अशी ठिकाणे न्याय्य पद्धतीने कन्टेनमेन्ट जोन म्‍हणून घोषित करावीत जेणेकरून लहान भागांमध्‍ये विशेषतः जिथे मोठया प्रमाणावर रुग्‍ण आढळून येत आहेत अश्‍या ठिकाणी निर्बंध लागू करता येईल व रुग्‍ण संख्‍या वाढीचा दर कमी करण्‍यावर नियंत्रण मिळवणे शक्‍य होईल.

8)      पोलीस प्रशासन, सर्व तहसीलदार, नगर पालीका / नगर पंचायत, सर्व गट विकास अधिकारी जि.जालना यांनी त्‍यांचे स्‍तरावर फिरते पथकाची स्‍थापना करून सार्वजनीक स्‍थळी Covid Appropriate Behaviorचे पालन होत आहे किंवा कसे, या बाबत खातरजमा करावी विशेषतः लग्‍न समारंभ / रेस्‍टॉरन्‍टस / इतर गर्दीची ठिकाणे Covid Appropriate Behaviorचे पालन होत नसल्‍याचे निर्दशनास आल्‍यास आवश्‍यक ती दंडात्‍मक कारवाई.

या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन तात्‍काळ कार्यवाही करण्‍यात यावी. आदेशाचे पालन न करणा-या कोणतीही व्‍यक्‍ती, संस्‍था अथवा समुह, भारतीय दंड स‍ंहिता 1860, साथरोगप्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. परंतु आदेशाची अंमलबजावणी करतांना सद्भावनेने केलेल्‍या कृत्‍यासाठी कोणत्‍याही अधिकारी, कर्मचारी यांचे विरुध्‍द कार्यवाही केली जाणार नसल्याचे असेही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *