ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

गटविमा गृहनिर्माण सभासदासचे व्याज माफ करावे

March 3, 202214:20 PM 37 0 0

जालना (प्रतिनिधी) :  गटविमा गृहनिर्माण कृतीसमितीच्या राज्याध्यक्षांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना गटविमा गृहनिर्माण सभासदासच्या व्याजमाफीच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.
या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 2005 साली गटविमा गृहनिर्माण योजना सुरू करण्यात आली. तसेच 2007 मध्ये पहिला हप्ता आणि 2009 मध्ये दुसरा व 2011 ला तिसरा हप्ता सहकार पणन व वस्त्र विभाग मंत्रालय मुंबई यांनी बिल्डरला वितरित केला. परंतु आज पर्यंत सभासदास घर मिळाले नसल्यामुळे सभासदास सेवानिवृत्त होत असतांना व्याज आणि मुद्दल भरल्याशिवाय सेवानिवृत्त वेतन मिळत नाही. व्याज माफी मिळावी यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे उप जिल्हाधिकारी केशव नेटके यांच्या मार्फत पाठविण्यात आलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *