ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

खारघर सेक्टर १६ येथे के.वाय.सी तर्फे जागतिक महिला दिन संपन्न

March 15, 202220:38 PM 36 0 0

पनवेल (देवयानी कुलकर्णी ) : खारघर दिनांक १३ रोजी वास्तू विहार सेक्टर १६ येथील केपीसी शाळेच्या मैदानामध्ये खारघर युथ काउंसिल ( KYC) च्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका लीना गरड, संजना कदम, हर्षदा उपाध्याय,तसेच सोनाली वारुंगसे, सविता वाळुंज, जयश्री घुले व जया सरगर, आशा मोरे इ.उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन खारघर पोलीस स्टेशनच्या पी.एस.आय विमल बिडवे यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन विद्या मोरे यांनी केले. या कार्यक्रमात वास्तु विहारमधील महिलांनी प्रचंड संख्येने हजेरी लावली. प्रत्येक महिलेचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.लहान मुलांनी ही महिलांच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आस्वाद घेतला. प्रमुख अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून महिलांच्या हितार्थ मार्गदर्शन करण्यात आले. लहान मुलांसाठी गेम्स तसेच महिलांसाठीही खेळांचे आयोजन करण्यात आले होते. लहान मुलांनी पारंपारिक संगीतावर नृत्याविष्कार करून आपली कला सादर केली.प्रत्येक खेळामधून एक महिला विजेती निवडण्यात आली. विजेत्यांना मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. एका पायाची लंगडी या खेळा मधून प्रथम पारितोषिक प्राची कुलकर्णी हिने तर न बघता पाणी एका ग्लास मधून दुसऱ्या ग्लास मध्ये ओतणे या खेळा मध्ये पारिजात सोसायटी च्या टीमने बाजी मारली.खारघर युथ कौन्सिल तर्फे आज पर्यंत फक्त पुरुषांसाठीच हॉलीबॉल तथा क्रिकेटचे सामने सामने भरविण्यात आले होते. त्यामुळे के.वाय.सी तर्फे महिलांसाठीही क्रिकेटचे सामने व जागतिक महिला दिनाचा समारंभ हा उपक्रम पहिल्यांदाच राबविण्यात आला. यापुढेही महिलांसाठी विविध प्रकारचे बैठे किंवा मैदानी खेळाचे सामने, व विविध उपक्रम राबविले जातील, व त्यामुळे स्त्रियांचाही शारीरिक व मानसिक विकास होईल. अशी ग्वाही के.वाय.सी च्या प्रमुख टीमने दिली.स्त्रियांच्या सर्वांगीण विकासासाठी केवायसी ही संस्था सतत कार्यरत राहील, तसेच महिलांनी ही आपल्या रटा ळवाण्या आयुष्यातून थोडा वेळ स्वतःसाठी काढावा व स्वतःच्या विकासासाठी एक पाऊल पुढे टाकावे हाच या कौन्सिलचा मुख्य उद्देश असेल.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *