भारतामधील कोरोनाचे संकट दूर व्हावे म्हणून इस्त्रायल मधील ज्यूंनी केलेली प्रार्थना व ॐ नमः शिवाय हा सामूहिक नामजपामुळे मिळालेला मानसिक आधार हीच आम्हा भारतीयांची शक्ती आहे.
भारतामध्ये कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेने कहर केलेला असताना जगभरातील विविध देशांमधून भारताला मदतीचा हात मिळत आहे. भारतीयांचे जीवन कोविड-19 मुळे खूप दुःखदायक झालेले असताना, अनेक देशांनी मानवता दर्शवून भारताला केलेली मदत स्तुत्यच आहे. अनेक देशांनी मेडिकल इक्विपमेंट पाठवले. इस्रायल या देशाने तर ऑक्सिजन कोन्सट्रेटर्स व रेस्पिरेटर्स पाठवण्या सोबतच भारताला भावनिक व मानसिक आधारही दिला. इस्त्रायल मधील भारताचे राजनैतिक अधिकारी पवन पाल यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये हजारो इस्राईल एकत्र एका ठिकाणी आले त्यांनी भारतीयांना कोरोनाच्या परिस्थितीतून लवकर बाहेर पडता यावे, यासाठी सामूहिक प्रार्थना केली व ‘ॐ नमः शिवाय’ याचा एकत्रित नामजप ही केला. याद्वारे त्यांनी भगवान शिवशंकर यांना भारतीयांना या संकटातून बाहेर निघता यावे यासाठी केलेली प्रार्थना आम्हा भारतीयांना खूप मोठा भावनिक व मानसिक आधार देऊन गेली.
भारतीयांना कठीण परिस्थितीमध्ये भावनिक व मानसिक आधार देणारा हा देश भारताचा खरा मित्र ठरला, यासाठी आपण सर्वजण इजरायल या देशाचे नेहमीच ऋणी राहू.
सौ रोहिणी जोशी, संभाजीनगर
Leave a Reply