ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

लोखंडी पुलाचे सामाजिक संघटनांकडून “संविधान पूल ” नामांतर

June 23, 202112:32 PM 41 0 0

जालना ( प्रतिनिधी) : नवीन व जुना जालना भागास जोडणाऱ्या लोखंडी पुलास सामाजिक संघटनांनी मंगळवारी ( ता. २२) “संविधान पूल “हे नाव देऊन नामांतर केले .

ब्रिटिश राजवटीत उभारलेल्या पुलाची जीर्ण अवस्था झाली होती. दोन वर्षांपूर्वी नुतनीकरणास सुरुवात झालेल्या पूलाचे काम पूर्ण झाले. दरम्यान जुना जालना भागाच्या टोकावर संविधान स्तंभ असल्याने सदर पुलास संविधान पूल हे नाव देण्यात यावे अशी मागणी संविधान प्रेमी नागरिकांकडून केली जात होती . विविध संघटनानी तसे निवेदन ही दिले होते.मात्र प्रशासना कडून दिरंगाई होत असल्याने अखेर छत्रपती फाऊंडेशनशन व विद्रोही पँथर सामाजिक विकास संघटनांनी नवीन पुलास संविधान पुलाचे नाम फलक लावले.
या वेळी सुनील रत्नपारखे, कपिल खरात, संदीप साबळे, बबलू शेख, लाला चौधरी, भास्कर बोर्डे, राहुल खरात, निरंत पट्टेबहादुर, राहुल उघडे, अमोल राउत, महेंद्र वाघमारे, महेंद्र डी रत्नपारखे, अमोल रत्नपारखे, विशाल तेझाड़, माधव जाधव, राहुल रत्नपारखे, संदीप मोरे, विशाल रत्नपारखे, किरण गंगातीवरे, लखन चित्तेकर यांच्यासह संविधान प्रेमी नागरिकांची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *