ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मोटरसायकलवरील इसमांनी हिसकावले वृद्ध महिलेच्या गळ्यातील दागिने

April 12, 202216:39 PM 26 0 0

फलटण – फिरायला गेलेल्या एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील दागिने दोन अनोळखी मोटरसायकल वरील इसमांनी हिसकावून चोरून नेल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीमती विमल दत्तात्रय राऊत (वय-76 वर्षे, रा.हाडको काँलनी,साईनगर रुम नं.81 फलटण ता. फलटण) या दिनांक 1 रोजी नेहमी प्रमाणे सायंकाळी 6.30 वाजता घरातुन पायी चालत निघुन हाडको काँलनी येथुन गोळीबार मैदान जाणारे रोडने पायी चालत जात असताना अचानक पाठीमागुन रोडने एक मोटार सायकलस्वार जवळ आला व मोटर सायकल वरील 30 ते 35 वयोगटातील मध्यम बांध्याचे तोंडास रुमाल बांधलेल्या लाल शर्ट घातलेल्या पाठीमागे बसलेल्या इसमाने फिर्यादी महिलेच्या गळ्यातील दीड तोळा वजनाचे सोन्याचे 60 हजार रुपये किंमतीचे मिनी गंठण ला हाताने धरुन हिसका मारुन तोडले व पळून गेले. याबाबत फिर्यादी श्रीमती विमल दत्तात्रय राऊत यांनी शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अनोळखी दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *