महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग जालनाच्या वतीने राष्ट्रीय/सामाजिक/ शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंत शिक्षकांना दरवर्षी पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या वर्षी (सन २०२०-२१) सदर गुणवंत शिक्षक पुरस्कार जिल्ह्यातील पदाधिकारी/अधिकारी यांचे उपस्थितीत दि.१८ सप्टेंबर, २०२१, शनिवार रोजी दुपारी २ वाजता समारंभपुर्वक वितरित केले जाणार असल्याचे कळते.
शिक्षक परिषदेच्या वतीने गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी सोबतच्या LINK द्वारे जालना जिल्हयातील सर्व तालुक्यांतून प्रस्ताव मागविण्यात येत आहे.
गुणवंत शिक्षक निवडीसाठी स्वतंत्र समिती गठित करण्यात आलेली असून प्राप्त प्रस्तावांवर साकल्याने विचार करून सदर समिती पात्र शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड करणार आहे.
जास्तीत जास्त शिक्षकांनी सोबतच्या LINKवरून ( https://forms.gle/gxwkUsKdAe9va1Dj6 )
आपल्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची माहिती दि. १० सप्टेंबर २०२१ पर्यंत भरून सहकार्य करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्रा.), जालना यांचेतर्फे करण्यात आले आहे.
Leave a Reply