ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

लोकशाहीचे जतन करणे ही सर्वांची जबाबदारी : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

January 26, 202212:56 PM 38 0 -1

जालना : भारत हा लोकशाही मुल्यांची जपवणूक करणारा जगाच्या पाठीवरील एकमेव देश आहे. त्यामुळे सर्वांनी लोकशाहीचे जतन करावे. आपल्या देशात निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून ही लोकशाही अधिकाधिक वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न केले जातात. प्रत्येक मतदाराने मुक्त, नि:पक्षपाती तसेच धर्म,वंश,जात,समाज,भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता निवडणूकवेळी निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोपप्रसंगी डॉ. राठोड बोलत होते. यावळी अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी अंजली कानडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. ज्ञानोबा बानापुरे, जिल्हा नियोजन अधिकारी सूनिल सुर्यवंशी, तहसिलदार डॉ. संतोष पडघन, तहसिलदार संतोष गोरड, नायब तहसीलदार एस.एफ.मिराशे, श्री. अनर्थे, विक्रांत मोंढे, दिव्यांग आयकॉन निकेश मदारे यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले की, भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीत नाव नोंदणीसाठी एन.व्ही.एस.पी. पोर्टल, वोटर पोर्टल, वोटर हेल्पलाईन ॲप यासह विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले आहेत याचा उपयोग नवमतदारांनी करावा. तसेच निवडणूक साक्षरता मंचच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही व निवडणूक प्रक्रियेविषयी जनजागृती करणे गरजेचे आहे. प्रास्ताविक उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. ज्ञानोबा बानापुरे यांनी केले. तर दिव्यांग आयकॉन निकेश मदारे यांनी भारत निवडणूक आयोग दिव्यांग मतदारांसाठी राबवित असलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील प्रथम क्रमांक पटकावलेली आदिती काळे,चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेली स्नेहल आबासाहेब घुगे, घोषवाक्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेली मयुरी मोहिते तर मौजे खांबेवाडी ता.जि.जालना येथील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी विष्णु बिरादार यांना उत्कृष्ट मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून गौरविण्यात आले. तसेच दोन तरुण, दोन महिला व एक तृतीयपंथी अशा पाच नवमतदारांना प्रातिनिधिक स्वरूपात इपिक कार्ड वाटप करण्यात आले. शेवटी मतदारांसाठीची प्रतिज्ञा घेण्यात आली.
यावर्षी १२ वा राष्ट्रीय मतदार दिवस भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्वसमावेशक, सुलभ, सहभागपूर्ण निवडणुका या थिमनुसार साजरा करण्यात आला. कार्यक्रमास नायब तहसीलदार, अव्वल कारकून, महसुल सहाय्यक तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी गंगाधर जोशी यांनी यावर्षीच्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या थिमवर आधारीत रांगोळी काढली होती. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन संजय कांयदे यांनी केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *