ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मराठवाड्याचे नाव जगाच्या पाठीवर उंचावर नेणे हे आपले कर्तव्य; कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूलचे चेअरमन विनयकुमार कोठारी यांचे प्रतिपादन

September 17, 202113:12 PM 50 0 0

जालना : कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल येथे कोविड-19 चे नियम पाळून मोठ्या उत्साहात मराठवाडा मुक्ति संग्राम दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास ध्वजारोहण करून सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्कूलचे संचालक विनयकुमार कोठारी, प्रसन्न कोठारी व सुभाषचंद भंडारी यांची उपस्थिती होती.

तसेच कार्यक्रमास स्कूलचे मुख्यध्यापक एस. मुकींदा यांचे मार्गदर्शन लाभले. श्री. कोठारी म्हणाले की, मराठवाड्याचे नाव जगाच्या पाठीवर उंचावर नेणे हे आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन केले. यावेळी विध्यार्थ्यांनी ऑनलाईन भाषण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार तुकाराम मार्कंडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *