ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

करोना काळात देवदूत बनलेले सोनू सूद वरील प्राप्तिकर विभागाची छापेमारी दुर्दैवी

September 17, 202113:44 PM 51 0 0

सोनू सूदची स्वत:ची कंपनी आहे.या कंपनीने अलीकडेच लखनौमधील एका रिअल इस्टेट कंपनीशी करार केला.हा करार संशयास्पद असुन त्यामध्ये करचुकवेगिरी झाल्याचा प्राप्तिकर विभागाला संशय आहे.त्यासाठी ही कारवाई होत असल्याचे सांगण्यात येत आहे.प्राप्तिकर विभागा मार्फत सोनू सूदवर होत असलेली कारवाई दु:खद आणि निंदनीय आहे.कारण सोनू सूद करोना काळात गरीबांच्या मदतीला धावून आले होते.त्यामुळे सोनू सूदचे नाव आजही प्रत्येक भारतवासीयांच्या मुखातून निघते.सोनू सूदने  देवदूताचा सन्मान सरकारला किंवा अन्य कोणालाही मागीतला नसुन देशाच्या 130 कोटी जनतेने दिलेला आहे.सध्याच्या परिस्थितीत देशात ईडी, सीबीआय किंवा अन्य चौकशी ह्या राजकीय प्रेरीत व बदल्याच्या भावनेने सुरू आहे,म्हणजेच केंद्र विरूध्द राज्य सरकार ही बाब सर्वांनाच ग्यात आहे.त्या पध्दतीची कारवाई सोनू सूद वर नकोच.परंतु सोनू सूद हा कोव्हीड काळात देवदूत बनलेला होता.सोनू सूदच्या सेवाभावी संकल्पनेचा विचार केला तर असे दिसून येईल की त्यांनी

आपल्या जिवाची पर्वा न करता गरीबांची सरळ हातांनी मदत व सेवा केली आहे.मी तर या गोष्टीला देवदुतच म्हणेल.करोना काळात खरी मानुसकी काय असते व पैशांचा उपयोग कुठे आणि कसा करायचा हे सोनूसूदच्या आचरणावरून आणि विचारावरून दिसून येते.त्यामुळेच आज संपूर्ण भारतात सोनू सूदचे नाव घेतल्या जाते.आज भारतात पुंजीपती, वॉलीउड क्षेत्र, राजकीय पुढारी यांच्या जवळ आजही करोडों रूपयांची संपत्ती आहे.यांना जर एकत्र केले तर देशाला 10 वर्षे कोनाहीजवळुन कर्ज घ्यायची गरज भासणार नाही.परंतु तसे होने शक्य नाही.जर आपल्या जवळ असलेली संपत्ती योग्य वेळी वापरण्यात आली नाही तर त्या संपत्तीला अर्थच रहाणार नाही.करोना काळात अनेक पुंजीपती व राजकीय पुढाऱ्यांनी आपली संपत्ती दडवुन ठेवली.परंतु करोना महामारीच्या काळात पैशाचा व संपत्तीचा खरा वापर सोनू सूदने केला असे मी समजतो.करोना काळातील सोनू सूदचे काम पहाता सरकारने प्रोत्साहन देवून सहकार्य करण्याची गरज होती.परंतु आज प्राप्तिकर विभागा मार्फत एकूण 6 ठिकाणी छापे मारून तो गुन्हेगार असल्याचे दाखविण्यात येत आहे.त्यामुळे सोनू सूदवर होत असलेली कारवाई ही नकारात्मक दृष्टिकोनातून होत असल्याचे दिसून येते.कारण चांगले काम करणाऱ्याचे सुध्दा वैरी असतात ही बाब सोनू सूदच्या कारवाई वरून स्पष्ट होते.सोनू सूदच्या मालमत्तेची जी कारवाई केली जात आहे ती प्राप्तिकर विभागाची छापेमारी नसुन फक्त सर्व्हे ऑपरेशन असल्याचे म्हटले जात आहे.यामध्ये फक्त मालमत्तेची माहिती घेतली जात आहे.कारवाई लगेच नाही, असेही प्राप्तिकर विभागाने स्पष्ट केले आहे.सोनू सूदवरील ही कारवाई एक प्रापर्टीच्या अकाउंट बुकमध्ये गडबडी असल्याच्या आरोपावरून ही कारवाई होत असल्याचे सांगण्यात येत आहे.त्यामुळेच सोनू सूदच्या प्रापर्टीच्या 6 ठीकाणावर छापे मारण्यात आले आहे.असेही सांगण्यात येत आहे की काही दिवसांपूर्वी दिल्ली सरकारने सूदला विद्यार्थ्यांशी संबंधित कार्यक्रमाचा ब्रांड एम्बेसडर बनवीला.यामुळे आम आदमी पार्टीमध्ये सामील होण्याची चर्चासुध्दा होती.परंतु सोनू सूदने सांगितले की राजकीय स्तरावर कोणतीही चर्चा झालेली नाही.सोनू सूदचे करोना काळात लॉकडाउच्या परिस्थितीत इतर राज्यांतील लोकांना त्यांच्या घरी पोहचवीण्याचा संकल्प केला.यानंतर अनेक संस्थांनांच्या मार्फत संपूर्ण देशभर मदतीला धावून गेले.अनेक राज्यांनी सुध्दा सोनू सूद सोबत काम करण्यास हात मिळविला.या व्यतीरीक्त सोनूने गुडवर्कर जॉब ऐप, स्कॉलरशिप प्रोग्राम सुध्दा चालविला.त्याचप्रमाणे महत्त्वाची गोष्ट म्हणजे देशातील 16 शहरांमध्ये ऑक्सिजन प्लांटसुध्दा लावत आहे.याला काय म्हणावे मसीहा की गुन्हेगार यांचा विचार प्राप्तिकर विभागाने व सरकारने करावा.कारण कोणताही व्यक्ती असो त्यांनी जर चांगले मार्गदर्शन, चांगले काम, चांगले आचरण केले असेल तर त्याला चांगल्या कामाची पावती मिळायलाच हवी व अवश्य मिळेल.त्यामुळे सोनू सूदवरील कारवाई निंदनीय आणि दु:खद आहे.सोनू सूदला फोरबेस (Forbes) ने “लिडरशिप अवार्ड” देवून “कोव्हीड-19 चा हीरो” घोषित केले.त्यामुळे सोनू सूद वरील कारवाईने लोकांच्या भावना दु:खावणार नाही याची दक्षता प्राप्तिकर विभाग व सरकार अवश्य घेईल अशी मला खात्री आहे.

लेखक
रमेश कृष्णराव लांजेवार
(माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर)
मो.नं.9921690779, नागपूर.

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *