ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

ज.ए. इन्स्टिट्यूट एम.एस.ई.बी.बोकडविरा शाळेत मातृदिन उत्साहात साजरा

August 27, 202217:46 PM 11 0 0

उरण (तृप्ती भोईर) : आज दि.२६ ऑगस्ट  २०२२ रोजी जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट एम. एस. ई. बी .बोकडवीरा शाळेमध्ये पिठोरी अमावस्या व मातृदिन निमित्त शालेय समिती अध्यक्ष श्री. सदानंदजी गायकवाड सरांच्या मार्गदर्शनाखाली मातृदिन साजरा करण्यात आला.

सदर कार्यक्रमास सौ. अर्चना कुंवरवार मॅडम ,सौ.वाघ मॅडम व सौ. शिंदे मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात आई विषयी उपकार मानणाऱ्या गीताने करण्यात आली. तसेच इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी कु.धनश्री गडदे हिने पिठोरीची गोष्ट सांगितली. नंतर विद्यार्थ्यांनी आपल्या आईचे पाय धुऊन पूजन केले व औक्षण करून आईला छोटीशी भेटवस्तू दिली. तसेच सर्वांना खाऊ देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

 

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *