ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जे.ई.एस. महाविद्यालयामध्ये पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम संपन्न

September 17, 202113:41 PM 52 0 0

जालना : येथील जे.ई.एस. महाविद्यालयामध्ये आज रोजी पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून विविध उपक्रमांनी सर्वत्र साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या वतीने या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवनारायण बजाज यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुरस्कार देऊन गौरविण्यात आले सुरुवातीला मराठवाडा मुक्ति दिनाच्या निमित्ताने मा. प्राचार्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. घुसिंगे वर्षा देवीसिंग, चुंगडे सोनाली शामसिंग, लोखंडे राहुल भाऊसाहेब, वैष्णवी वाघमारे, आदित्य सुनील कुलकर्णी, जयंत कल्याणकर, पूनम वैजनाथ शिंदे, वरद भांगड़िया, साचल महेश बिहानी, आदित्य एस. चांडलिया यांनी विविध स्पर्धांमध्ये पारितोषिक पटकावले. यावेळी वांग्मय मंडळाचे प्रमुख डॉ. नानासाहेब गोरे, एन.सी.सी. चे कॅप्टन डॉ. फुलचंद मोहिते उपस्थित होते. विविध स्पर्धांचे संयोजक व परीक्षक म्हणून प्रा. शिवाजी वानरे, डॉ. राजेंद्र सोनवणे, डॉ. हेमंत वर्मा, डॉ. मनीषा सुतार, प्रा. कविता बागडी, प्रा. भाग्यश्री बियाणी यांनी काम पाहिले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *